उल्हासनगर, 25 मार्च: उल्हासनगरमधील कॅम्प 5 येथील साईनाथ कॉलनी परिसरात अमानुषतेचा कळस गाठणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याठिकाणी काही अज्ञात तरुणांनी मुक्या प्राण्यासोबत क्रूरतेचा कळस गाठला आहे. आरोपींनी एका श्वानाला आणि तिच्या पिल्लाला झाडाला लटकवून भयावह पद्धतीने हत्या केली आहे. हा संतापजनक प्रकार उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी हिल लाईन पोलीस ठाण्यात अज्ञात मारेकऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित घटना उल्हासनगरातील कॅम्प 5 येथील साईनाथ कॉलनी परिसरात घडली आहे. बुधवारी (16 मार्च) रात्री उशिरा काही अज्ञात तरुणांनी मुक्या जीवासोबत क्रूरतेचा कळस गाठला आहे. आरोपींनी श्वानासह तिच्या पिल्ला फास देऊन झाडाला लटकावलं आहे. या घटनेची माहिती 'पीपल फॉर अॅनिमल' संस्थेच्या प्राणीमित्र सृष्टी चुग यांना मिळाल्यानंतर या धक्कादायक प्रकाराला वाचा फुटली आहे.
हेही वाचा- महिला डॉक्टरचा लॉजमध्ये भयावह शेवट, धक्कादायक घटनेनं नांदेड हादरलं!
याबाबत समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी स्थानिकांच्या मदतीने श्वानाला आणि पिल्लाला झाडावरून खाली उतरवून शवविच्छेदनासाठी पाठवलं. यानंतर त्यांनी हिल लाईन पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दाखल केली. पोलिसांनी प्राण्याचा अमानुष छळ प्रतिबंधक कलमाअन्वये अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. संबंधित हत्या नेमकी कोणी केली? याची कोणतीही माहिती अद्याप पोलिसांना मिळाली नाही. पोलीस मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत.
हेही वाचा-पुण्यातील शाळेत चिमुकलीवर अत्याचार करणारा गजाआड, धक्कादायक माहिती उघड
दुसऱ्या एका घटनेत, काही दिवसांपूर्वी 7 अल्पवयीन मुलांनी भटक्या कुत्र्याच्या 3 पिल्लांना जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. तरुणांपैकी एकाने या घटनेचं चित्रीकरण केलं होतं. हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. ही घटना मुशीराबादमधील पठाणवाडी परिसरात ही घटना घडली आहे. पोलिसांनी या विकृत 7 मुलांना ताब्यात घेत त्यांना समुपदेशनासाठी पाठवण्यात आलं होतं. संबंधित मुलं कुत्र्याच्या पिल्लांच्या शेपटीला धरुन त्यांना आगीत फेकत असल्याचं व्हिडिओत दिसलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Ulhasnagar