मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /परदेशातून औषध आणून देण्याच्या नावाखाली रुग्णाला दिली पिठी साखर, डॉक्टराने घातला लाखोंचा गंडा

परदेशातून औषध आणून देण्याच्या नावाखाली रुग्णाला दिली पिठी साखर, डॉक्टराने घातला लाखोंचा गंडा

'आपण या औषधाने बरे होऊ' या आशेने जनार्दनने उसनवार पैसे घेत डॉक्टरांना दिले. मात्र...

'आपण या औषधाने बरे होऊ' या आशेने जनार्दनने उसनवार पैसे घेत डॉक्टरांना दिले. मात्र...

'आपण या औषधाने बरे होऊ' या आशेने जनार्दनने उसनवार पैसे घेत डॉक्टरांना दिले. मात्र...

बदलापूर, 06 मार्च : दक्षिण आफ्रिकेतून (South Africa) औषध (medicine)आणून  देण्याच्या नावाखाली एका रुग्णाला डॉक्टरांने कोणतेही नाव नसलेले चक्क स्पिरिट सदृश्य द्रव पदार्थ दिल्याचा आरोप रुग्णाने केला आहे. वांगणी या ग्रामीण भागात हा प्रकार घडला आहे. शिवाय यासाठी डॉक्टराने औषधासाठी रुग्णाला साधी पावती देऊन 36 हजार देखील घेतले आहेत. मात्र, डॉक्टरने आपल्यावर लावलेले आरोप खोटे असल्याचे सांगितले आहे. या प्रकरणी रुग्णाने पोलीस अधीक्षक ठाणे यांना तक्रार अर्ज दिला आहे.

बदलापूर (Badlapur) जवळील वांगणी इथल्या भोई सावरे या ग्रामीण भागात जनार्दन भोईर (Janardan Bhoir) आपल्या कुटुंबीयांसोबत राहतात. ते काही दिवसांपासून किडनीच्या (kidney) विकाराने त्रस्त आहेत. याच दरम्यान 26 फेब्रुवारी रोजी त्यांनी वांगणीमधील शिला क्लिनिकच्या डॉक्टर यु.एस.गुप्ता (U.S. Gupta) यांच्याकडे उपचार घेतला. यावेळी सहा दिवसांच्या उपचारादरम्यान त्यांनी 41 इंजेक्शन जनार्दन यांना दिली. त्यामुळे त्यांची प्रकृती ढासळली. दरम्यान, याच उपचारासाठी डॉक्टरांनी त्यांच्या कडून 1 लाख 10 हजार रुपये घेतले. मात्र तुझ्यासाठी दक्षिण आफ्रिकेतून औषध मागवतो, असे सांगून त्यांनी जनार्दनला 36 हजार देण्यास सांगितले. रक्कम देण्यास उशीर झाला तर त्यावर 36 टक्के जी.एस.टी म्हणून आणखी 12 हजार लागतील असे डॉक्टरांनी त्याला सांगितले.

जगातला पहिला 18GB रॅम असणारा स्मार्टफोन लाँच; पाहा किती आहे किंमत

'आपण या औषधाने बरे होऊ' या आशेने जनार्दनने उसनवार पैसे घेत डॉक्टरांना दिले. मात्र, डॉक्टरांने विदेशातून औषध देण्याच्या नावाखाली फसवणूक करीत स्पिरिट आणि सॅनिटायझर सदृश्य द्रव आणि पिठी साखर दिली, असा आरोप रुग्ण जनार्दन भोईर याने केला आहे.

दर पंधरा मिनिटाला दोन ड्रॉप घ्यायला डॉक्टरांनी सांगितले मात्र ते घेतल्याने त्रास झाल्याचे देखील जनार्दन याने सांगितले. आपली फसवणूक झाल्याचे कळताच जनार्दनने या प्रकरणी ठाणे पोलीस अधीक्षक, बदलापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज केला आहे.

मात्र, आपल्यावर केलेले सर्व आरोप खोटे असल्याचे स्पष्टीकरण डॉक्टर गुप्ता यांनी दिले आहे. 'मी असे स्पिरिट आणि सॅनिटायझर सारखे औषध दिले नाही, त्यांच्या शरीराला जे औषध उपयुक्त ठरेल तेच औषध दिले आहे, आमच्याकडे औषधांचा साठा येतो, रुगांच्या प्रकृती नुसार औषधांचे मिश्रण करून ते द्यावे लागते' असे डॉक्टर गुप्ता यांनी सांगितले.

IND vs ENG : आशिष नेहरासोबतच्या टीम इंडियाच्या या खेळाडूला ओळखलंत का?

औषधाच्या बाटलीवर कोणत्या प्रकारची एम.आर.पी औषधात कोणत्या घटकांचा समावेश आहे हे नमूद करण्यात आलेले नाही. त्यामुळे असे औषध घेतल्यास रुग्णाच्या आरोग्याला धोका होऊ शकतो. त्यामुळे अशा प्रकारे उपचार करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई झाली पाहिजे, अशा डॉक्टरांमुळे चांगले काम करणाऱ्या डॉक्टरांचे नाव खराब होत असल्याचे अंबरनाथमधील प्रसिद्ध डॉक्टर मनोज कंडोई याचे  म्हणणं आहे.

तर या प्रकरणी आरोग्य विभागाला माहीत देऊन पुढील कारवाई करणार असल्याचे बदलापूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्याने सांगितले आहे. या प्रकारामुळे ग्रामीण भागातील बोगस डॉक्टरांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. ग्रामीण भागात अनेकदा बोगस डिग्रीच्या आधारे आपले दुकान थाटून नागरिकांना लुटण्याचे प्रकार सुरू आहेत. त्यांच्यावर आरोग्य विभागाने कडक कारवाई करण्याची गरज आहे.

First published:
top videos

    Tags: Badlapur, Crime, Financial fraud, Maharashtra, Money, Scam