मसाज करायला शिकवण्याच्या बहाण्यानं डॉक्टरचे लैंगिक चाळे, पुण्यातील धक्कादायक प्रकार

मसाज करायला शिकवण्याच्या बहाण्यानं डॉक्टरचे लैंगिक चाळे, पुण्यातील धक्कादायक प्रकार

Pune Crime: पुण्यातील एका डॉक्टरकडे (Doctor) काम मागण्यासाठी गेलेल्या महिलेचा संबंधित डॉक्टरानं विनयभंग (Molestation) केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कर्वेनगर परिसरात या डॉक्टरचा आयुर्वेदिक दावाखाना (Ayurvedic Hospital) आहे.

  • Share this:

पुणे, 20 डिसेंबर: मुलींची छेड काढणे, त्यांचा विनयभंग (Molestation) करणे अशा घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. अशातच पुण्यातून (Pune) विनयभंगाची एक घटना समोर आली आहे. पुण्यातील एका डॉक्टरकडे (Doctor) काम मागण्यासाठी गेलेल्या महिलेचा संबंधित डॉक्टरानं विनयभंग (Molestation) केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

कर्वेनगर परिसरात या डॉक्टरचा आयुर्वेदिक दावाखाना (Ayurvedic Hospital) आहे. येथे काम मागायला आलेल्या 57 वर्षीय महिलेचा या 48 वर्षीय डॉक्टरनं विनयभंग केला आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?  

एक महिला कर्वेनगर येथील एका आयुर्वेदिक दवाखान्यात काम मागण्यासाठी गेली होती. त्यावेळी आरोपी डॉक्टरनं तुम्हाला मसाज करता येता का? अशी विचारणा केली. त्यानंतर तुम्हाला मसाज शिकवतो, असं म्हणत त्यानं संधीचा फायदा घेतला. आरोपी डॉक्टरानं मसाज शिकवण्याच्या बहाण्यानं या महिलेला वाईट हेतुनं स्पर्श करत तिचा विनयभंग केला. त्यानंतर पीडित महिलेनं या डॉक्टराविरुद्ध अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी पावणेअकराच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी डॉक्टरला अटक केली आहे.

फिर्यादी महिलेनं दिलेल्या तक्रारीनुसार, ही महिला आरोपी डॉक्टरांकडे काम मागण्यासाठी गेली होती. तेव्हा डॉक्टरानं मसाज करता येते का? अशी विचारणा केली. तसेच फिर्यादी महिलेला मसाज करायला शिकवतो, असं म्हणत त्यानं मसाज शिकवण्याच्या बहाण्याने या महिलेच्या अंगाला वाईट भावनेने स्पर्श केले. त्याचबरोबर ड्रॉवरमधील पैसे दाखवत दुपारी दीड वाजता येता का? अशी विचारणाही केली. याप्रकरणी महिलेनं संबंधित डॉक्टरवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक गाडे करीत आहेत.

Published by: News18 Desk
First published: December 20, 2020, 10:10 PM IST
Tags: crimepune

ताज्या बातम्या