कटक, 18 फेब्रुवारी : सायबर गुन्हेगारी (cyber crime) हे आजच्या आधुनिक संवाद तंत्रज्ञानाच्या जगातील वास्तव आहे. निरक्षरच नाही तर सुशिक्षित लोकही अशा जाळ्यात अडकत असल्याचे दिसतात. ओडिसातील एका डॉक्टरसोबत अशीच भयानक घटना घडली आहे.
ओडिसाच्या कटक (Cuttack) इथं राहणाऱ्या एका डॉक्टरच्या बँक खात्यातून तब्बल 77, 86,727 रुपये सायबर गुन्हेगारांनी (cyber thieves) लुटले आहेत. डॉक्टरनं याबाबत तक्रार (complain) दिल्यावर ही घटना उघडकीस आली. सनातन मोहंती असं या डॉक्टरचं नाव आहे. सिम कार्ड ऍक्टिवेट (activating sim card) करण्याबाबत खोट्या गोष्टी बोलून या डॉक्टरसोबत हे केलं गेलं.
तक्रारीत डॉक्टरनं म्हटलं आहे, की त्याला 9 फेब्रुवारीला एक कॉल आला. यात पलीकडून व्यक्ती सांगत होती, की तुमचं बीएसएनएल सीम (BSNL Sim) लवकरच बंद पडेल. आम्ही ते चालू करून देण्यास मदत करू असंही त्या व्यक्तीनं सांगितलं.
या कॉलदरम्यानच त्या डॉक्टरला बोलण्यात गुंतवत त्याच्याकडून या सायबर चोरांनी त्याच्या एसबीआय बँक खात्याची (SBI Bank Account) माहिती आणि डेबिट कार्डचे डिटेल्सही (debit card details) काढून घेतले. सोबतच थेट सीव्हीव्ही नंबरही (CVV Number) काढून घेतला. हा सगळा केवायसी प्रोसेसचा भाग असल्याचं या चोरांनी डॉक्टरला सांगितलं.
डॉक्टरला या सगळ्यात जराही शंका आली नाही. डॉक्टरनं या सगळ्या डिटेल्स दिल्यावर त्याला एक एसएमएस आला. हा एसएमएस सांगत होता, की तुमचं एटीएम ब्लॉक केलं गेलं आहे. या तक्रारीत डॉक्टरनं दिलं आहे, की अचानक माझ्या मोबाईलवर मेसेज आला, की माझं एटीएम 9 फेब्रुवारीच्या 6.35 पर्यंत बंद केलेलं आहे. मी एसबीआयमध्ये बिदानासी शाखेत चौकशी केली. मला तेव्हा कळालं, की अनुक्रमे 25,292 आणि 24,284 इतकी रक्कम माझ्या खात्यातून दोन ट्रान्झॅक्शन्सद्वारे काढली गेली आहे.
हेही वाचाज्वेलर्स दुकान फोडून 2 कोटींचे दागिने पळवले, बाजूलाच होते पोलीस स्टेशन!
डॉक्टराचा दावा आहे, की 15 फेब्रुवारीला मी तुलासीपूर होम ब्रँचला गेलो. त्यावेळी मला कळालं, की 9 ते 15 फेब्रुवारीदरम्यान अनेकवेळा माझ्या खात्यातून रक्कम काढली गेली आहे. ही रक्कम तब्बल 77,86,727 इतकी आहे.
डॉक्टरच्या तक्रारीनुसार, त्यानं बिदानासी शाखेला भेट दिल्यावर ब्रँच व्यवस्थापकानं त्याला नवीन एटीएम कार्ड दिलं. भविष्यात त्याची अशी कुठली फसवणूक होणार नाही अशी त्याला खात्रीही दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cyber crime, SBI bank