मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

अवघ्या 40 दिवसात डॉक्टर, इंजिनिअर, MBA ची डिग्री; देशातील प्रसिद्ध विद्यापीठांची नावं पाहून पोलिसही हैराण!

अवघ्या 40 दिवसात डॉक्टर, इंजिनिअर, MBA ची डिग्री; देशातील प्रसिद्ध विद्यापीठांची नावं पाहून पोलिसही हैराण!

केवळ खासगी नाही तर अनेक सरकारी विद्यापीठात हा प्रकार घडत असल्याचं समोर आलं.

केवळ खासगी नाही तर अनेक सरकारी विद्यापीठात हा प्रकार घडत असल्याचं समोर आलं.

केवळ खासगी नाही तर अनेक सरकारी विद्यापीठात हा प्रकार घडत असल्याचं समोर आलं.

  • Published by:  Meenal Gangurde

चंंडीगड, 4 फेब्रुवारी : पंजाबमधील मोहाली पोलिसांकडे आलेल्या एका प्रकरणात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका टोळीतील तरुण 30 ते 40 दिवसांत इंजिनिअर, डॉक्टर, एमबीए, एमटेक, अकाऊंटेन्टची डिग्री देत होते. हा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनाही धक्का बसला.  काही जणांकडून हे गुन्हेगारी कृत्य केलं जात होतं. या टोळीचं जाळं पंजाब, हिमाचल, उत्तर प्रदेश, दिल्ली आणि मध्य प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये पसरलेलं होतं. या टोळीमधील सदस्य 16 सरकारी आणि खासगी विद्यापीठांची बनावटी प्रमाणपत्राचं वाटप करीत होते. पोलिसांनी या टोळीकडून खोटी प्रमाणपत्र, होलोग्राम, कम्प्युटर, स्टॅम्बसह अनेक वस्तू जप्त केल्या आहेत. पोलिसांनी या टोळीतील पाच गुन्हेगारांविरोधात तक्रार दाखल केली आहे.

काही आरोपी 2012 पासून तर काही 2017 पासून या टोळीत काम करीत होते. यामध्ये काम करणाऱ्या तरुणांचं वय 21 ते 35 दरम्यान आहे. या टोळीचा प्रमुख आनंद विक्रम हा गाजियाबाद येथील राहणारा आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये निर्मल सिंह निम्मा गाव करतारपूर ठाणे मुल्लांपूर गरीबदास, विष्णू शर्मा निवासी निधी हाय कॉलजी मथुरा (उत्तर प्रदेश), सुशांत त्यागी, संचालक वीर फाऊंडेशन डिस्टेन्स एज्युकेशन मेरठ आणि आनंदविक्रम सिंह निवासी सेक्टर - 2, वैशाली गाजियाबाद येथील आहे. एसएसपी कार्यालयात आयोजित एक पत्रकार परिषदेत एसपी डॉ. रवजोत कौर ग्रेवाल आणि डीएसपी जीरकपूर अमरोज सिंह यांनी या टोळीबाबत पत्रकारांना माहिती दिली. त्यांनी सांगितलं की, पाच गुन्हेगारांविरोधात फसवणुकीसह अनेक कलमांअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

हे ही वाचा-6 लाखाच्या दागिन्यांची बॅग लोकलमध्येच राहिली, नंतर घडलं मोठं नाट्य

1 ते दीड लाखात डिग्री

एसपी डॉ. रवजोत कौर ग्रेवाल यांनी सांगितलं की, पोलिसांना मिळालेल्या सूचनेनुसार आरोपीने अनेकांना बनावटी प्रमाणपत्र तयार करुन दिले. यानंतर पोलिसांनी सर्वात आधी निम्माला अटक केलं. यानंतर आरोपींची चौकशी केल्यानंतर या टोळीतील अनेक गुन्हेगारांना अटक केलं. आरोपी संपूर्ण देशात स्टडी सेंटर चालवत होते. हा तरुण एका प्रमाणपत्रासाठी 1 ते दीड लाख रुपये घेत होता. शिवाय प्रमाणपत्र खरे वाटावे यासाठी तो होलोग्रामचादेखील वापर करीत होता.

या संस्थांनी जारी केलं बनावटी प्रमाणपत्र

1. आदेश यूनिवर्सिटी, बठिंडा (Adesh University, Bathinda Punjab)

2. आयटीसी यूनिवर्सिटी, हिमाचल प्रदेश (ITC University, Himachal Pradesh)

3. आयके गुजराल पंजाब टेक्निकल यूनिवर्सिटी, जालंधर (IK Gujral Punjab Technical University, Jalandhar Punjab)

4. बुंदेलखंड यूनिवर्सिटी, झांसी (Bundelkhand University, Jhansi)

5. छत्रपती शाहू जी महाराज यूनिवर्सिटी, कानपुर (Chhatrapati Shahu Ji Maharaj University, Kanpur UP)

6. चौधरी चरण सिंह यूनिवर्सिटी, मेरठ (Chaudhary Charan Singh University, Meerut UP)

7. गुरु गोबिंद सिंह कॉलेज ऑफ एज्युकेशन पंजाब गुरु काशी यूनिवर्सिटी तलवंडी साबो (Guru Gobind Singh College of Education Punjab Guru Kashi University Talwandi Sabo Punjab)

8. हरियाणा काउंसिल ऑफ ओपन स्कूलिंग (Haryana Council of Open Schooling)

9. सिक्किम यूनिवर्सिटी (Sikkim University)

10. काउंसिल ऑफ दि इंडियन स्कूल ऑफ सर्टिफिकेट ऑर्गेनाइजेशन, नई दिल्ली (Council of the Indian School of Certificate Organization, New Delhi)

11. मानव भारती यूनिवर्सिटी, सोलन हिमाचल प्रदेश (Manav Bharati University, Solan Himachal Pradesh)

12. नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग (National Institute of Open Schooling)

13. पंजाब स्कूल शिक्षा बोर्ड, मोहाली (Punjab School Education Board, Mohali punjab)

14. पंजाब स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एंड इंडस्ट्रियल ट्रेनिंग चंडीगढ़ (लाला लाजपत राय कॉलेज ऑफ मोगा)

(Punjab State Board of Technical and Industrial Training Chandigarh (Lala Lajpat Rai College of Moga)

15. पंजाबी यूनिवर्सिटी, पटियाला (Punjabi University, Patiala Punjab)

16. स्वामी विवेकानंद सुभारती यूनिवर्सिटी, मेरठ (Swami Vivekananda Subharti University, Meerut UP)

पोलिसांना टोळीकडून या वस्तू सापडल्या

1. आय-20 कार, बनावटी नंबर प्लेट

2. 859 खोटी सर्टिफिकेट

3. 546 रिकामे पेपर्स

4. 93 स्टॅम्प

5. 5102 खोटे होलोग्राम

6. 16 खोटे रिसिप्ट बुक

7. 1855 खोटे पेपर सर्टिफिकेट

8. तीन सीपीयू

9. एक सप्लायर  हँडर हाई ग्रैंड

10. दोन की-बोर्ड

11. 6 लॅपटॉप

12. चार प्रिंटर

13. दोन रिम पेपर खोटे सर्टिफिकेट

14. एक फोटो प्रिंटर मशीन

15. दो एलसीडी स्क्रीन

First published:

Tags: Crime news, Education