मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

सासरे अन् मेहुणीच्या त्रासाला कंटाळून डॉक्टरची आत्महत्या; 4 पानी सुसाईड नोटमधून धक्कादायक खुलासा

सासरे अन् मेहुणीच्या त्रासाला कंटाळून डॉक्टरची आत्महत्या; 4 पानी सुसाईड नोटमधून धक्कादायक खुलासा

डॉ. गौरव गुप्ता यांनी विषारी इंजेक्शन घेऊन आत्महत्या (Suicide) केली. पोलिसांना घटनास्थळी त्यांनी लिहिलेली चार पानी सुसाईड नोट (Suicide Note) आणि सुकोल नावाचं इंजेक्शन सापडलं आहे.

डॉ. गौरव गुप्ता यांनी विषारी इंजेक्शन घेऊन आत्महत्या (Suicide) केली. पोलिसांना घटनास्थळी त्यांनी लिहिलेली चार पानी सुसाईड नोट (Suicide Note) आणि सुकोल नावाचं इंजेक्शन सापडलं आहे.

डॉ. गौरव गुप्ता यांनी विषारी इंजेक्शन घेऊन आत्महत्या (Suicide) केली. पोलिसांना घटनास्थळी त्यांनी लिहिलेली चार पानी सुसाईड नोट (Suicide Note) आणि सुकोल नावाचं इंजेक्शन सापडलं आहे.

नवी दिल्ली 01 सप्टेंबर : अलीकडच्या काळात पत्नीकडून तसंच तिच्या घरच्यांकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून पतीने आत्महत्या केल्याच्या किंवा पोलिसांकडे तक्रार केल्याच्या घटना वाढत आहेत. मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमधील (Gwalior) एका तरुण डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणानं ही बाब पुन्हा अधोरेखित केली आहे. ग्वाल्हेरमधील डॉ. गौरव गुप्ता यांनी विषारी इंजेक्शन घेऊन आत्महत्या (Suicide) केली. पोलिसांना घटनास्थळी त्यांनी लिहिलेली चार पानी सुसाईड नोट (Suicide Note) आणि सुकोल नावाचं इंजेक्शन सापडलं आहे.

पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. दैनिक भास्करनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.डॉ. गुप्ता यांनी सुसाईड नोटमध्ये आपले सासरे (Father In Law) आणि मेहुणी (Sister in Law) आपल्याला कसा मानसिक त्रास (Mental Harassment) देत होते, याबाबत सविस्तर माहिती दिली असून, लग्नापासून आजपर्यंतच्या प्रत्येक गोष्टीचा उल्लेख केला आहे. चार पानांमध्ये 20 वेळा त्यांनी पत्नी शैलीसाठी (Wife Shaily) सर्व काही सहन करत राहिल्याचे म्हटले आहे. आपल्याला जगायचे होते, पण या लोकांनी जगणे मुश्कील केलं असून, आपल्याला आत्महत्या करायला भाग पाडलं आहे. यासाठी आपले सासरे, मेहुणी आणि पत्नी शैली हिलादेखील कठोर शिक्षा व्हावी असं त्यांनी या सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे.

बडा घर पोकळ वासा; पुण्यात 1 किलो सोन्यासाठी उच्च शिक्षित विवाहितेचा अमानुष छळ

ग्वाल्हेरच्या सिटी सेंटर पटेल नगरमध्ये राहणारे डॉ. गौरव कुमार गुप्ता हे रेल्वेमध्ये (Railway) डॉक्टर म्हणून कार्यरत होते. साधारण साडेआठ वर्षांपूर्वी त्यांचा विवाह डॉ. अनिल गुप्ता यांची मुलगी शैली गुप्ता हिच्याशी झाला होता. डॉ. गौरव गुप्ता आणि त्यांची पत्नी शैली यांच्यात वाद होत होते, पण शैली यांचे वडील डॉ. अनिल गुप्ता आणि शैली यांची बहिण नेहा रुसिया त्यांना मानसिक त्रास देत होते. डॉ. गुप्ता यांना लग्नाच्या साडेआठ वर्षानंतरही मूल नव्हते. यासाठीही सासरे त्यांनाच जबाबदार धरत असत. डॉक्टर अनिल गुप्ता आणि नेहा रुसिया सातत्याने हुंडा मागितल्याचा आणि छळ केल्याचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन घटस्फोटाच्या कागदपत्रावर (Divorce Paper) सही करण्यासाठी दबाव आणत होते. घटस्फोटाच्या कागदापत्रांमध्ये 2 वर्षांपासून पत्नीपासून वेगळे राहत असल्याचे खोटे लिहिले असून, आई, मामा या सगळ्यांना पोलीस केसमध्ये अडकवण्याची धमकी देत होते, असं डॉ. गुप्ता यांनी या पत्रात नमूद केलं आहे.

‘आपल्या घरातील सर्व सामान पत्नी शैली हिनं एका दिवसात हलवलं. सासऱ्यांना हातापाया पडून मी विनवणी केली, मात्र त्यांनी त्रास देणे थांबवले नाही. मला शैलीबरोबर आयुष्य काढायचं होतं. म्हणून मी सगळे सहन केलं. माझी झोप उडाली. रात्र रात्र मी झोपू शकत नव्हतो. माझं खाणंपिणं, झोप, आयुष्यातील आनंद सगळं उद्ध्वस्त झालं होतं. आता हा त्रास मला असह्य झाला आहे. आता मी खूप थकलो आहे. कोणत्याही आईने आपला मुलगा, भावाने भाऊ गमावू नये. यासाठी अशा लोकांना कडक शासन व्हावे, असं डॉ. गुप्ता यांनी लिहिले आहे.

लग्नाच्या 6व्या दिवशीच सुखी संसाराचं स्वप्न धुळीस; वधुच्या कृत्यानं कुटुंब हैराण

डॉक्टर गुप्ता सोमवारी रात्री आपला मित्र महेंद्र याच्या नर्सिंग होममध्ये गेले. रात्री ते तिथेच एका खोलीत राहिले होते. रात्री त्यांनी अनेस्थेशिया आणि सर्जिकल प्रक्रियेदरम्यान स्नायू शिथील करण्यासाठी सुकोल नावाच्या इंजेक्शनचा मोठा डोस इंजेक्शनद्वारे स्वतःला टोचून घेतला. सकाळी ते मृतावस्थेत सापडले. त्यांच्या शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण निश्चित होईल, असे पोलिसांनी म्हटलं आहे.

First published:

Tags: Crime news, Suicide news