नातेवाईकांची डॉक्टरला चपलीनं मारहाण; निगेटिव्ह रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह दिल्याचा आरोप

नातेवाईकांची डॉक्टरला चपलीनं मारहाण; निगेटिव्ह रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह दिल्याचा आरोप

विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात गुरुवारी एका डॉक्टरला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. डॉक्टरने पैशे उकळण्याच्या हव्यासापोटी निगेटीव्ह रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं सांगितल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी केला आहे.

  • Share this:

गोंदिया, 17 एप्रिल: महाराष्ट्रात सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव (Corona Pandemic) मोठ्या प्रमाणात वाढत आहे. राज्यात दररोज 60 हजारांहून अधिक कोरोना रुग्णांची (Corona patients) नोंद होतं आहे. अशात विदर्भातील बहुतांशी जिल्ह्यात देखील कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. दरम्यान डॉक्टरांना मारहाण (Doctor beaten by patient relative) करण्याचे किंवा कोविड सेंटरची तोडफोड केल्याची काही प्रकरणं समोर येत आहेत. त्यामुळे डॉक्टरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे.

दैनिक भास्करने दिलेल्या वृत्तानुसार, विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात गुरुवारी एका डॉक्टरला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. मारहाण करणाऱ्या लोकांच्या मते, डॉक्टराने पैशे उकळण्याच्या हव्यासापोटी कोरोना निगेटीव्ह रुग्णाला पॉझिटिव्ह असल्याचं सांगत रुग्णालयात दाखल करून घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे संतापलेल्या नातेवाईकांनी संबंधित डॉक्टराला चांगलीच मारहाण केली आहे. संबंधित घटना गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी तालुक्यातील आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियात संताप व्यक्त केला जात आहे.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर डुग्गीपार पोलिसांनी संबंधित रुग्णावर आणि त्याच्या नातेवाईकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पण या मारहाण प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून संतापलेले नातेवाईक डॉक्टराला चपलीने मारहाण करताना दिसत आहेत. त्याचबरोबर नातेवाईक अर्वाच्च भाषेत शिवीगाळही करत आहेत. या व्हिडीओच्या अधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास केला जात आहे.

हे ही वाचा-धक्कादायक! मेळघाटात कोरोना रुग्णावर मांत्रिकाकडून उपचार; महिलेचा मृत्यू

गोंदियात गुरूवारी एकूण 16 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर संक्रमित लोकांच्या संख्येतही प्रचंड वाढ झाली आहे. गोंदियात गुरुवारी 616 रुग्ण आढळले असून जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या 23210 वर पोहचली आहे. यातील 15983 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर सध्या जिल्ह्यात एकूण 6997 सक्रिय रुग्ण असून मृतांचा आकडा 224 वर गेला आहे.

Published by: News18 Desk
First published: April 17, 2021, 9:40 PM IST

ताज्या बातम्या