अकोला, 23 जानेवारी : अकोल्यातील (Akola) उच्चभ्रू परिसर समजल्या जाणाऱ्या जवाहरनगरमध्ये मसाज सेंटरच्या (massage center ) नावाखाली चालवल्या जाणाऱ्या वेश्या व्यवसायाचा अकोला दहशतवादी विरोधी पथकाने (ATS) पर्दाफाश केला आहे. या कारवाईत चार जणांना अटक करण्यात आली.
अकोला शहरातील जवाहरनगर येथे रुग्णांना मसाज थेरपीद्वारे आराम मिळावा या करिता तेजस्वी हेल्थ केअर नावाने डॉक्टर देशमुख यांनी व्यवसाय सुरू केला होता. याच हेल्थ केअर सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची खात्री लायक माहिती अकोला दहशतवाद विरोधी पथक प्रमुख विलास पाटील यांना मिळाली होती.
वरुण-नताशा यांच्या लग्नाची जोरदार चर्चा, व्हायरल होतायंत सेलेब्सबरोबरचे हे Photo
त्यानंतर विलास पाटील यांच्या नेतृत्वाखाली पथकाने सापळा रचून बनावट ग्राहक तेथे पाठवला असता सदर ठिकाणी वेश्या व्यवसाय सुरू असल्याची खात्री पटली. त्यानंतर तातडीने अकोला पोलिसांनी तेथे छापा टाकला. या कारवाईमध्ये घटनास्थळावरून डॉ. प्रदीप देशमुख याच्यासोबत संतोष सानप, रतन लोखंडे यांच्यासह पीडित महिलेला ताब्यात घेतले आहे.
'जयंत पाटील हे अनवधानाने राजकारणात आलेले पात्र', पडळकरांची विखारी टीका
सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन च्या हद्दीत सुरू असलेल्या या वेश्या व्यवसायाबाबत पुसटशी कल्पना देखील नसल्याने त्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. अकोल्यातील गजबजलेल्या परिसरात ही रेड पडल्याने अकोला शहरात आश्चर्य व्यक्त होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.