मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /हा तर हैवान? गर्भपात करून अर्भकाचे केले पाच तुकडे, नगरमधली संतापजनक घटना

हा तर हैवान? गर्भपात करून अर्भकाचे केले पाच तुकडे, नगरमधली संतापजनक घटना

या भागात डॉक्टरांची टोळी सक्रिय असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे पोलिसांनी आणखी काही डॉक्टरांवर आपली नजर वळवली आहे.

या भागात डॉक्टरांची टोळी सक्रिय असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे पोलिसांनी आणखी काही डॉक्टरांवर आपली नजर वळवली आहे.

या भागात डॉक्टरांची टोळी सक्रिय असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे पोलिसांनी आणखी काही डॉक्टरांवर आपली नजर वळवली आहे.

  अहमदनगर 23 जून: हॉस्पिटलमध्ये महिलेचा गर्भपात (Abortion of a woman) करून अर्भकाचे पाच तुकडे केल्याची संतापजनक घटना अहमदनगरमध्ये(Ahmednagar) घटली आहे. आरोपी डॉ. शंकरप्रसाद उर्फ सुनील गंधे (Doctor) यांनी त्या महिलेचा गर्भपात करून अर्भकाचे निर्घृणपणे पाच तुकडे केल्याचे समोर आले, या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात (Nagar Police) गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

  अहमदनगर तालुक्यातील जखणगाव यातील गंधे सर्जीलकल हॉस्पिटलमध्ये गर्भपात झाल्याची माहिती अहमदनगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अखिलेश सिंह यांना निनावी फोन आला. त्यांनी गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेऊन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप मुरणबीकर यांना माहिती दिली.  डॉक्टरांच्या पथकाने हॉस्पिटलमध्ये जाऊन कारवाई केली.

  कारवाई दरम्यान आरोपी डॉ. शंकरप्रसाद उर्फ सुनील गंधे यांनी त्या महिलेचा गर्भपात करून त्या अर्भकाचे निर्घृणपणे पाच तुकडे केल्याचे समोर आले, या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

  डॉ. प्रदिप मुरणबीकर हे त्यांची टीम घेऊन  येथून जखणगाव येथे गेले तेव्हा त्यांना डॉक्टरकडे अनेक आक्षेपार्ह गोष्टी होत असल्याचं लक्षात आलं.

  खेळता खेळता पाझर तलावाकडे वळले पाय, एकाच कुटुंबातील पाच मुलींचा बुडून मृत्यू

  शेततळ्यात बुडून 4 भावंडांचा मृत्यू, ऊस कामगार कुटुंबावर शोककळा

  यासंदर्भात पोलिस स्टेशनने गुन्हा नोंदवला आहे तसेच  कलम 312, 313, 315  अंतर्गत आता पुढची कारवाई होणार आहे. नगरमध्ये याआधीही गर्भपाताच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे या भागात डॉक्टरांची टोळी सक्रिय असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे पोलिसांनी आणखी काही डॉक्टरांवर आपली नजर वळवली आहे.

  संपादन - अजय कौटिकवार

   

   

  First published:
  top videos

   Tags: Ahmadnagar, Doctor