मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /अकरावीच्या विद्यार्थ्याबरोबर शिक्षिका गेली पळून, Lockdown मुळे घरातच घेत होती लेक्चर्स

अकरावीच्या विद्यार्थ्याबरोबर शिक्षिका गेली पळून, Lockdown मुळे घरातच घेत होती लेक्चर्स

(File Photo)

(File Photo)

अकरावीत शिकणारा एक 17 वर्षीय मुलगा आणि त्याची वर्ग शिक्षिका पळून गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सध्या कोरोना आणि टाळेबंदीमुळं शाळा बंद असल्यानं या महिला शिक्षिकेच्या घरी क्लास घेण्यात येत होता.

पानिपत, 1 जून : विद्यार्थी आणि शिक्षकांच्या (Student Teacher Relation) नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. अकरावीत शिकणारा एक 17 वर्षीय मुलगा आणि त्याची वर्ग शिक्षिका पळून गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सध्या कोरोना आणि टाळेबंदीमुळं शाळा बंद असल्यानं या महिला शिक्षिकेच्या घरी क्लास घेण्यात येत होता. संबंधित शिक्षिका घटस्फोटीत असून तिच्या आईकडे राहण्यास आहे.

आपला मुलगा बेपत्ता झाल्यानं त्याच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात (Police Station) तक्रार दाखल केली. 17 वर्षीय मुलगा नेहमीप्रमाणे 29 मे रोजी दुपारी दोन वाजता महिला शिक्षिकेच्या घरी क्लाससाठी गेला होता. मात्र, कित्येक वेळ गेला तरी तो परत आला नसल्यानं त्याच्या घरच्यांनी शिक्षिकेच्या घरी चौकशी केली. सुरुवातीला त्यांच्याकडून कोणतीच माहिती देण्यात आली नाही. मात्र, काही वेळाने शिक्षिकेच्या वडिलांनी आपली मुलगी घरातून गायब झाली असल्याचे सांगितले. हा सर्व प्रकार हरियाणामधील पानिपत येथे घडला आहे.

दरम्यान, पोलिसांनी आता या महिला शिक्षिकेविरोधात मुलाच्या अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. आता या दोघांचाही पोलीस तपास करत आहेत, मात्र आतापर्यंत कोणतेच धागेदोरे हातात आलेले नाहीत. गायब झाल्यापासून दोघांचेही फोन बंद (स्विच ऑफ) आहेत. मुलाच्या वडिलांनी पोलिसांना सांगितलं की, आमचा मुलगा अकरावीच्या वर्गात शिकतोय आणि संबंधित शिक्षिका ही त्याची वर्ग शिक्षिका आहे.

हे वाचा - मुलीच्या प्रेमविवाहास मदत केल्याचा राग; CRPF जवानाने महिलेवर कोयत्याने केले सपासप वार

दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा अल्पवयीन युवक गेल्या दोन वर्षांपासून संबंधित महिला शिक्षिकेच्या घरी शिकवणीसाठी जात होता. अलीकडे टाळेबंदीमुळं शाळा बंद असल्यानं दररोज चार तास या महिलेच्या घरी त्याचा क्लास असायचा. मात्र, 29 मे रोजी धक्कादायकरित्या हे दोघेही गायब झाले आहेत. विशेष म्हणजे या दोघांकडेही मौल्यवान अशा कोणत्याही वस्तू किंवा पैसे नाहीत, महिला शिक्षिकेचा हातात केवळ एक अंगठी आहे, असे सांगण्यात आले. आता हे दोघे नेमके कुठे गेले असावेत याबाबत तर्क-वितर्क लावले जात आहेत.

First published:
top videos

    Tags: School student, School teacher