नांगरणीवरून चुलत भावासोबत वाद; कोरोबाधित रुग्णानं केलं धक्कादायक कृत्य, बीडमधील घटना

नांगरणीवरून चुलत भावासोबत वाद; कोरोबाधित रुग्णानं केलं धक्कादायक कृत्य, बीडमधील घटना

Crime in Beed: होम क्वारंटाइन असलेल्या एका कोरोनाबाधित रुग्णानं नांगरणीच्या वादातून आपल्या चुलत भावासोबत धक्कादायक कृत्य केलं आहे.

  • Share this:

बीड, 04 मे: मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोनाबाधित रुग्णांचा ( Corona patients) आलेख वाढतच चालला आहे. या वाढत्या रुग्णांचा प्रचंड ताण आरोग्य यंत्रणेवर पडत आहे. त्यामुळे कोरोनाची सौम्य लक्षणं असणाऱ्या रुग्णांना घरातच क्वारंटाइन (home quarantine) करण्यात येत आहे. अशात होम क्वारंटाइन असलेला एका कोरोनाबाधित रुग्ण नांगरणीच्या वादातून आपल्या चुलत भावावर थुंकला (corona infected patient spit on cousin's body) आहे. ही धक्कादायक घटना बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील सारुकवाडी येथे घडली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

केज तालुक्यातील सारुकवाडी येथील रहिवासी असलेले सुभाष फुंदे आणि त्याची आई कुसुम फुंदे दोघं कोरोनाबाधित आहेत. त्यामुळे त्यांना घरातच आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे. दरम्यान काल कोरोनाबाधित रुग्ण सुभाष फुंदेचा चुलत भाऊ दीपक फुंदे आणि त्याचे चुलते श्रीराम फुंदे शेतात पळाट्या गोळा करत होते. तर सुभाष शेतात नांगरणी करत होता.

यावेळी चुलत भाऊ दीपक  “तू आमच्या मालकीचं शेत नांगरु नको, तुझ्याच शेताची नांगरणी कर’, असं म्हणाला. यावरून दोघांत वादाला सुरुवात झाली. यानंतर संतापलेल्या कोरोनाबाधित सुभाषनं आपल्या तोंडाचा मास्क काढून चुलत भाऊ दीपकच्या अंगावर थुंकला. यावेळी आरोपी सुभाषची पत्नी उषा, आई कुसुम आणि वडील बळीराम तिघंही धावत आले आणि त्यांनी दीपक आणि त्याचे वडिल श्रीराम फुंदे या बापलेकाला काठीनं मारहाण केली.

हे ही वाचा- देशात लाखातील एक हजार कोरोना रुग्णांचा जातोय बळी, पॉझिटिव्हिटी रेट भयंकर वाढला

याप्रकरणी श्रीराम फुंदे यांनी केज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पीडित श्रीराम फुंदे यांनी दिलेल्या तक्रारीनंतर, पोलिसांनी बळीराम फुंदे, सुभाष फुंदे, कुसुम फुंदे आणि उषा फुंदे या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक अमोल गायकवाड करत आहेत.

Published by: News18 Desk
First published: May 4, 2021, 12:18 PM IST

ताज्या बातम्या