मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /10 रुपयांचं दूध सांडलं म्हणून झाला वाद; भररस्त्यात वाहिला रक्ताचा पाट

10 रुपयांचं दूध सांडलं म्हणून झाला वाद; भररस्त्यात वाहिला रक्ताचा पाट

छोटीशी गोष्ट इतकी मोठी झाली आणि यात एका व्यक्तीचा जीव गेला.

छोटीशी गोष्ट इतकी मोठी झाली आणि यात एका व्यक्तीचा जीव गेला.

छोटीशी गोष्ट इतकी मोठी झाली आणि यात एका व्यक्तीचा जीव गेला.

पानीपत, 23 ऑगस्ट : पानीपतमध्ये गुंडगिरीच्या अनेक घटना समोर येत आहेत. येथे नशेच्या अवस्थेत बाइकच्या धडकेनंतर 10 रुपयांचं दूध खाली सांडलं. यानंतर मात्र वाद झाला. या वादात शेजारच्याने लोखंडाच्या रॉडने तरुणाची हत्या केली. ही घटना बत्रा कॉलनीतून समोर आली आहे. शेजारील व्यक्ती आपली पत्नी आणि मेव्हण्यासोबत भांडण करीत होते. मृत व्यक्तीच्या पत्नीने आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ओल्ड इंस्ट्रियल पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

उत्तर-प्रदेशातील शाहजानपुर निवासी अनुराग यांनी सांगितलं की, त्यांचे कुटुंबीय गेल्या 22 वर्षांपासून पानीपतच्या बत्रा कॉलनीत भाडे तत्वावर राहत आहेत. त्यांचे वडील 42 वर्षीय महिपाल भंगारच्या सामानाचं काम करतात. राखीपौर्णिमेच्या निमित्ताने रविवारी त्यांचे मामा घरी आले होते. रविवारी रात्री साधारण 8 वाजता त्यांचे मामा दुकानात सामान घेण्यासाठी आले होते. त्याच वेळी त्यांच्या मागून बाईकने येणारा व शेजारी राहणाऱ्या अमरजीत यांची टक्कर झाली. अमरजीत याने दारू प्यायलाचा आरोप करण्यात आला होता. बाइकची धडक झाल्यामुळे अमरजीतच्या हातातून दुधाची 10 रुपयांची पिशवी खाली सांडली. या वरुन अमरजीत त्याचे मामा पूरणसोबत वाद करून लागले आणि त्यांच्या कानशिलात लगावली.

हे ही वाचा-निशब्द! 5 बहिणींनी भावाच्या मृतदेहाला बांधली राखी; अशी राखीपौर्णिमा कधीच नको

यावेळी आई शारदाने भांडण होताना पाहिलं तर त्या देखील पोहोचल्या. आरोपीने त्यांनाही मारहाण केली आणि सोन्याची चेन आणि कानातले काढून घेतले. गोंधळ ऐकून वडील महिपाल घटनास्थळी पोहोचले आणि मध्यस्थी केली. तेव्हा आरोपी लोखंडाचा रॉड घेऊन आला आणि त्याने महिलापच्या डोक्यावर हल्ला केला. त्याने वडिलांना वाचण्याचा प्रयत्न केला तर लोखंडाची रॉड त्याच्या छातीवर लागली. आरोपीने रॉडने 3 ते 4 वेळा वार केले. त्यानंतर वडील बेहोश होऊन जमिनीवर कोसळले. त्यानंतर आरोपीने घटनास्थळावरुन पळ काढला. त्याने आपल्या वडिलांना तातडीने वडिलांना रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. त्याचवेळी आरोपी अमरजीतही तेथे उपचारासाठी आला होता. यावेळी पोलिसांनी त्याला अटक केली.

First published:
top videos

    Tags: Crime news