आंबेडकर जयंतीला मिळालेल्या देणगीच्या वाटणीवरुन झाला वाद; काठीने बदडून युवकाची हत्या

आंबेडकर जयंतीला मिळालेल्या देणगीच्या वाटणीवरुन झाला वाद; काठीने बदडून युवकाची हत्या

Crime news: आंबेडकर जयंतीला मिळालेल्या देणगीत हिस्सा न मिळाल्यानं आपापसात झालेल्या वादातून एका युवकाने दुसऱ्या युवकाची काठीने बदडून हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

  • Share this:

चंदौली, 16 एप्रिल: आंबेडकर जयंतीला मिळालेल्या देणगीत हिस्सा न मिळाल्यानं आपापसात झालेल्या वादातून एका युवकाने दुसऱ्या युवकाची काठीने बदडून हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत मृत्यू झालेल्या 30 वर्षीय व्यक्तीचं नाव राकेश कुमार असून ते बीडीसी उमेदवार उषा देवी यांचे पती होते. किरकोळ कारणावरून झालेल्या वादात राकेश कुमार यांच्या डोक्यात गंभीर दुखापत झाली. दरम्यान नातेवाईकांनी त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची तयारी सुरू असतानाच राकेश कुमार यांची प्राणज्योत मालवली.

या हत्येच्या घटनेंनंतर गावात एक गोंधळ उडाला असून अनेक ग्रामस्थांनी आणि संतप्त नातेवाईकांनी रस्त्यावर उतरून चक्काजाम केला आहे. या घटनेची माहिती पोलीसांना मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी प्रेम प्रकाश मीणा घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेचा निष्पक्ष तपास करण्याचं आश्वासन एसडीएम प्रेम प्रकाश मीणा यांच्याकडून देण्यात आल्यानंतर गावातील तणावाची स्थिती निवळली. संबंधित घटना उत्तर प्रदेशातील चंदौली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फगुइयां या गावातील आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं मिळालेल्या देणगीवरून बीडीसी उमेदवारचा पती राकेश कुमार आणि अमित कुमार यांच्यात गुरुवारी दुपारी 3 च्या सुमारास दोघांत वाद झाला. सुरुवातीला बाचाबाची झाल्यानंतर या वादाच रुपांतर हाणामारीत झालं. दोघांनी एकमेकांना काठी आणि दांडक्यांनी बेदम मारहाण केली. यामध्ये बीडीसी उमेदवारचा पती राकेश कुमार यांच्या डोक्यात गंभीर दुखापत झाल्यानंतर ते जमीनीवर कोसळले. दरम्यान अमित कुमारही गंभीर जखमी झाला. यानंतर राकेश कुमार यांना रुग्णालयात नेण्याची तयारी करत असतानाच त्यांनी जीव सोडला.

या घटनेनंतर गावात एकच गोंधळ उडाला आहे. मृतकाचे अनेक नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतकाच्या नातेवाईकांच्या संतापामुळे परिसरात तणावाच वातावरण तयार झालं. दरम्यान पोलिसांनी येऊन लोकांना सूचना दिल्यानंतरही संतापलेल्या ग्रामस्थानी आणि नातेवाईकांना रास्ता रोको केला. यानंतर घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी जखमी युवकाला रुग्णालयात दाखल केलं.

हे ही वाचा-अवघडच आहे! महिला जेलर पडली कैद्याच्या प्रेमात; आता तिचीही झाली तुरुंगात रवानगी

एसपी अमित कुमार यांनी या घटनेबाबत माहिती देताना सांगितलं की, या घटनेमागील खरं कारण म्हणजे आंबेडकर जयंतीनिमित्त देण्यात आलेली देणगी आहे. आंबेडकर जयंतीच्या दिवशी दोन्ही तरुण एकत्र होते आणि जिल्हा पंचायतीच्या उमेदवारानं अडीच हजार रुपयांची देणगी दिली होती. या देणगीच्या वाटणीवरून दोघांत वाद झाला. ज्यामध्ये एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

Published by: News18 Desk
First published: April 16, 2021, 11:05 AM IST

ताज्या बातम्या