मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /हा काय वेडेपणा? घरात भांडण झाले म्हणून कुटुंबातील तिघांवर चढवली कार, एकाचा मृत्यू

हा काय वेडेपणा? घरात भांडण झाले म्हणून कुटुंबातील तिघांवर चढवली कार, एकाचा मृत्यू

मृताचा फोटो

मृताचा फोटो

रागाच्या भरात व्यक्ती काय करेल, याचा काहीच भरवशा राहिलेला नाही. याबाबतची एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

 • News18 Lokmat
 • Last Updated :
 • Punjab, India

  मोहाली, 2 फेब्रुवारी : देशात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत आहे. त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. परिवारात भांडण झाले म्हणून एकाने आपल्याच परिवारातील तिघांच्या अंगावर रेंज रोव्हर कार चालवली. यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे.

  काय आहे संपूर्ण प्रकरण -

  पंजाबमधील मोहाली येथून एक हृदयद्रावक घटना समोर आली असून. एका तरुण आपल्याच कुटुंबाच्या जीवावर उठला. मोहालीच्या मनौली गावात एका तरुणाने रागाच्या भरात आपल्याच कुटुंबातील तीन जणांवर कार चालवली. या वेदनादायक घटनेत आरोपीचा चुलत भाऊ रणजित सिंग (40) याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. देवेंदर (27) असे आरोपीचे नाव असून तो मनौली गावचा रहिवासी आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

  याप्रकरणी बलजीत सिंगने पोलिसांत तक्रार दिली आहे की, ते एकत्र कुटुंबासोबत राहतात. त्यांच्या काकाचा मुलगा देवेंद्र याचे घरात भांडण झाले होते. त्यामुळे तो रागावला आणि त्याची रेंज रोव्हर गाडी घेऊन घराबाहेर पडू लागला. हे पाहून त्याचा भाऊ रणजित सिंग, काका जर्नेल सिंग, देवेंदरची आई मनजीत कौर (काकू) त्याला रोखण्याचा प्रयत्न करत होते. त्यानंतर त्यांना घाबरवण्यासाठी त्याने वेगाने कार त्यांच्या दिशेने वळवली.

  हेही वाचा - प्रेग्नंट बहिणीच्या मदतीला आलेल्या मुलीसोबत मेहुण्याकडून धक्कादायक कृत्य, अमरावती हादरलं!

  बलजीतच्या म्हणण्यानुसार, कारच्या धडकेने ते सर्वजण जमिनीवर पडले आणि त्यांना गंभीर दुखापत झाली. तिघांनाही मोहालीच्या फेज-8 येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी रणजित सिंगला मृत घोषित केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या वेळेपासून आरोपी फरार असून, आरोपीची आईही या घटनेत गंभीर जखमी आहे. सध्या त्यांच्यावर खासगी रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. त्याचवेळी काका जर्नेल सिंग यांची प्रकृती ठीक आहे. रुग्णालयातून उपचारानंतर त्यांना घरी पाठवण्यात आले आहे.

  First published:

  Tags: Crime news, Punjab