• Home
 • »
 • News
 • »
 • crime
 • »
 • पुण्यात फुकटात टायर बदलून न दिल्यानं झाला वाद, मध्यस्थी करणाऱ्या तरुणावर कोयत्यानं सपासप वार

पुण्यात फुकटात टायर बदलून न दिल्यानं झाला वाद, मध्यस्थी करणाऱ्या तरुणावर कोयत्यानं सपासप वार

 राहुल हा पूर्वीपासून सराईत गुन्हेगार होता. राहुल मोहिते आणि चुलत भाऊ यांच्याबरोबर जमिनीवरुन नेहमी वाद करत होता.

राहुल हा पूर्वीपासून सराईत गुन्हेगार होता. राहुल मोहिते आणि चुलत भाऊ यांच्याबरोबर जमिनीवरुन नेहमी वाद करत होता.

Crime in Pune: दुचाकीचं टायर आणि ट्युब फुकटात बदलून न दिल्यानं संतापलेल्या चार युवकांनी एका तरुणावर कोयत्यानं जीवघेणा हल्ला (Attack on young man with sharpen weapon) केला आहे.

 • Share this:
  पुणे, 09 मे: दुचाकीचं टायर आणि ट्युब फुकटात बदलून न दिल्यानं संतापलेल्या चार युवकांनी एका तरुणावर कोयत्यानं जीवघेणा हल्ला (Attack on young man with sharpen weapon) केला आहे. आरोपी तरुणांनी पंक्चर दुकानाच्या (puncture shop) मालकासह दुकानातील कामगाराला लाथा बुक्क्यांनी मारहाण (beat) केली आहे. संबंधित घटना पुण्यातील रामटेकडी परिसरात रामनगर याठिकाणी घडली आहे. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोन संशयित आरोपींना अटक केली आहे. संबंधित अटक केलेल्या तरुणांची नावं अक्षय महेंद्र शिंदे आणि अजय महेंद्र शिंदे असं असून दोघंही रामटेकडी परिसरातील आदिनाथ सोसायटीतील रहिवासी आहेत. त्यांच्या इतर साथीदारांवर देखील गुन्हा दाखल केला असून त्यांना अद्याप अटक करण्यात आली नाही. याप्रकरणी जावेद अन्सारी याने फिर्याद दिली असून तो पंक्चरच्या दुकानात कामगार आहे. गुरुवारी सायंकाळी फिर्यादी दुकानात काम करत असताना, आरोपी अजय आणि अक्षयसह अन्य दोघं याठिकाणी आले. आरोपींनी दुचाकीचं चाक आणि ट्युब फुकटात बदलून देण्याची मागणी केली. पण फिर्यादी जावेद आणि पंक्चर दुकानाचा मालक रेहमत कुरेशी यांनी फुकटात ट्युब आणि टायर बदलून देण्यास नकार दिला. यामुळे संबंधित युवकांचा राग अनावर झाला आरोपींसहित अन्य दोघांनी जावेद आणि रेहमत यांना शिवीगाळ करून लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. हे ही वाचा-बदल्याची आग! पुण्यात फिल्मी स्टाइल राडा; क्षुल्लक वादातून तरुणांनी पेटवली कार दरम्यान, ही भांडणे सोडवण्यासाठी इरफान नावाचा युवक पुढे सरसावला. त्याने ही भांडणं सोडवण्याचा प्रयत्न केला. पण अगोदरच संतापलेल्या आरोपींनी भांडणात मध्यस्थी करणाऱ्या इरफानवरचं हल्ला केला. आरोपींनी इरफानवर धारदार कोयत्यानं सपासप वार केला. या दुर्दैवी हल्ल्यात इरफान गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. फिर्यादी जावेद अन्सारी यानं दिलेल्या फिर्यादीनंतर पोलिसांनी रामटेकडी परिसरातील आदिनाथ सोसायटीतून दोन संशयित आरोपींना अटक केली असून या घटनेचा पुढील तपास वानवडी पोलीस करत आहेत.
  Published by:News18 Desk
  First published: