Home /News /crime /

किळसवाणा प्रकार! माणसांची हत्या करुन त्यांच्या मांसाचा बनवायचे लोणचं; पती-पत्नीच्या या कृत्यामुळे परिसरात खळबळ

किळसवाणा प्रकार! माणसांची हत्या करुन त्यांच्या मांसाचा बनवायचे लोणचं; पती-पत्नीच्या या कृत्यामुळे परिसरात खळबळ

पती-पत्नी गेल्या अनेक वर्षांपासून लोकांची हत्या करीत होते, त्यांच्या घरात पोलिसांनी छापा टाकला तर तेथे अशा गोष्टी आढळल्या ज्या पाहून त्यांच्या पायाखालची जमिनच सरकली.

    मास्को, 9 नोव्हेंबर : जगात अशा अनेक घटना असतात ज्यामुळे लोक हैराण होतात. 2017 मध्ये रशियामध्ये अशीच विक्षिप्त घटना समोर आली होती. येथील एका पती-पत्नीला पोलिसांनी अटक केली होती. हे दाम्पत्याला जेव्हा अटक करण्यात आलं होतं, तेव्हा त्यांच्यावर वेट्रेससह एका व्यक्तीची हत्या आणि त्यानंतर त्याचे मांस (Meat) खाल्ल्याचा आरोप होता. त्यानंतर या दोघांनी अनेक खुलासे केले असून ज्या ऐकून लोक हैराण झाले आहेत. पोलिसांनी तपासानंतर खुलासा केला आहे की, या दाम्पत्याने 30 हून अधिक लोकांची हत्या (Murder) केली व त्यानंतर त्याच्या मांसाचं लोणच बनवून त्याची रेस्टॉरंटमध्ये विक्री केली. यानंतर अनेक शहरांमध्ये खळबळ उडाली होती. रशियामधील रशियातील क्रासनोदर शहरातील पोलीस फेरफटका मारत असताना एक मोबाइल सापडला होता. पोलिसांनी जेव्हा फोन चेक केला तेव्हा त्यांना एका फोटो दिसला ज्यामध्ये एक व्यक्ती मृत शरीरासोबत सेल्फी घेत होता. यानंतर पोलिसांनी या व्यक्तीचा तपास सुरू केला. काही दिवसांच्या शोधानंतर अखेर पोलिसांना त्या दोघांचा पत्ता सापडला. पोलिसांनी जेव्हा त्यांच्या घराची झडती घेतली तेव्हा ते हैराण झाले. हे ही वाचा-OMG! नदी की रक्ताचा पाट? VIDEO पाहून तुम्हीही व्हाल हैराण या दाम्पत्याच्या घरातून पोलिसांना 8 जणांच्या शरीराचे अवयव सापडले. इतकच नाही पोलिसांना त्यांच्या घरात एक बंद खोली दिसली होती, ज्यातून पोलिसांनी 19 जणांची कातडी जप्त केली. पोलिसांना यांच्या घरातून एक लोणच्याचा जारही सापडला. त्यानंतर झालेल्या खुलाशानुसार हे लोणचं माणसाच्या मांसपासून तयार करण्यात आलं होतं. शिजवलेल्या मांसाचे अनेक डब्बे स्वयंपाकघरात ठेवले होते. यादरम्यान पोलिसांनी त्याच्या घरातून अनेक मोबाइल फोन जप्त केले. याशिवाय पोलिसांना एका मोबाइलमध्ये व्हिडीओ सापडला ज्यामध्ये या दाम्पत्याने सांगितलं की, माणसाचं मांस कसं शिजवलं जातं. दरम्यान अनेक मीडिया रिपोर्टमध्ये या गोष्टीचा दावा केला होता की, या दाम्पत्याने शेवटी एका वेट्रेसला मारलं होतं. एका डेटिंग अॅपच्या माध्यमातून तिला बोलावलं होतं. काही मीडिया रिपोर्टने दावा केला होता की, वेट्रेसचं वय 35 असून तिचं नाव एलेना वशुर्शेवा होतं. वेट्रेस वशुर्शेवा 35 वर्षांच्या दिमित्री बाकेशेवला आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत होती आणि दिमित्रीची 42 वर्षांची पत्नी नतालियाला हे अजिबात आवडत नव्हतं, आणि याच कारणाने त्यांनी तिची हत्या केली. पोलिसांसोबत केलेल्या चौकशीदरम्यान या दाम्पत्याने आपला गुन्हा कबूल केला. दाम्पत्याने 1999 मध्ये सर्वांत पहिली हत्या केली, त्यानंतर हत्यांची संख्या वाढत होती. या दाम्पत्याने साधारण 30 जणांचे फोटो पाहून दावा केला आहे की, त्यांनी 30 जणांची हत्या करून त्यांना खाल्लं. नतालियाने एका अनाथ आश्रमातून दिमित्री बाकेशेवला दत्ताक घेतलं होतं. आणि जेव्हा तो 18 वर्षांचा झाला तिने त्याच्यासोबत लग्न केलं. सांगितले जाते की दिमित्री डेटिंग अॅपच्या माध्यमातून महिलांना फसवत होता आणि ज्या तरुणी येत होत्या त्यांची हत्या करून त्यांना खाल्लं असे. नतालिया व्यवसायाने नर्स होती. दोघे मिलेट्री अकॅडमीच्या क्‍वार्टर हॉस्‍टलमध्ये राहत होते. या दोघांनी अनेक मिलेट्री विद्यार्थी आणि ट्रेनी पायलटांना हे मांस खाऊ घातलं होतं. त्यानंतर या दाम्पत्याला शिक्षा मिळाली. या प्रकरणात दिमित्रीला 12 आणि नतालियाला 11 वर्षांची शिक्षा मिळाली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला दिमित्रीचा मृत्यू झाला.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Crime news, Russia

    पुढील बातम्या