'तू माझी बायको आहेस...'; अनैसर्गिक संबंधांसाठी पत्नीवर करीत होता जबरदस्ती; तरुणीने घेतला मोठा निर्णय

'तू माझी बायको आहेस...'; अनैसर्गिक संबंधांसाठी पत्नीवर करीत होता जबरदस्ती; तरुणीने घेतला मोठा निर्णय

'पती वेगवेगळ्या प्रकारांची मागणी करतो. ज्या अत्यंत क्रुर व त्रासदायक असतात'

  • Share this:

नवी दिल्ली, 1 फेब्रुवारी : देशाची राजधानी दिल्लीत एका तरुणीने लग्नाच्या दीड वर्षांनंतर पतीकडून घटस्फोट घेण्यासाठी कोर्टात धाव घेतली आहे. तिने यामागे सांगितलेलं कारण ऐकून अनेकांना धक्काच बसला आहे. पतीच्या वागणुकीबरोबरच अनैसर्गिक लैंगिक संबंधामुळे तिने घटस्फोटाचं पाऊल उचललं. लग्नाचं कारण पुढे करत तो व्यक्ती पत्नीसोबत अनैसर्गिक लैंगिक संबंध ठेवण्यास जबरदस्ती करीत होता. (Forcing a wife to have unnatural sex on the grounds of marital relationship) कोर्टाने अनैसर्गिक लैंगिक संबंध ठेवण्याच्या आधारावर तरुणीच्या घटस्फोटाची याचिका मंजूर केली आहे.

आपल्या निर्णयात कोर्टाने सांगितलं की, पती-पत्नीमध्ये होणारे संबंध हे सहमतीने होणं आवश्यक आहे. अशात दोघांपैकी कोणावरही जबरदस्ती करणे योग्य नाही. त्याशिवाय अनैसर्गिक लैंगिक संबंध थेट क्रुरतेच्या श्रेणीमध्ये येतो. दिल्ली पोलिसांत केलेल्या तक्रारीचा आधार घेत कोर्टाने हा निर्णय दिला. पोलिसात तक्रार केल्यानंतर तरुणीचे वैद्यकीय चाचणी करण्यात आली, यामध्ये तरुणीवर अनैसर्गिक लैंगिक संबंधासाठी जबरदस्ती केल्याचे समोर आले.

हे ही वाचा-पर्यटन स्थळावर उभं राहून सेल्फी घेत असताना विद्यार्थीनी 40 फूट खाली पडली

दीड वर्षांपूर्वी दोघांचं लग्न झालं होतं. लग्नानंतर तरुणी कुटुंबीयांकडे पतीच्या चुकीच्या वागणुकीबाबत तक्रार करीत होती. तिने सांगितलं की, पती वेगवेगळ्या प्रकारांची मागणी करतो. ज्या अत्यंत क्रुर व त्रासदायक असतात. यावेळी एकेदिवशी पत्नीने घरी फोन करुन आपल्यासोबत घडलेला प्रकार सांगितला होता. कुटुंबीय तिच्या सासरी गेले आणि तरुणीचे वैद्यकीय चाचणी केली. (Forcing a wife to have unnatural sex on the grounds of marital relationship) ज्यामध्ये पत्नीसोबत क्रुर वागणूक झाल्याचे समोर आले. त्यानंतर पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

हा प्रकार समोर आल्यानंतर पतीच्या कुटुंबीयांनी तरुणीकडे केस मागे घेण्याची विनंती केली. यावर पीडिता म्हणाली की तिला सासरच्या मंडळींचा काही त्रास नव्हता, मात्र पतीच्या वाईट वागणुकीमुळे तिला कोर्टाचा दार ठोठवावं लागलं.

Published by: Manoj Khandekar
First published: February 1, 2021, 2:58 PM IST

ताज्या बातम्या