मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

'ही मुलं माझी नाही' म्हणत अपंग बापाने 13 वर्षांच्या मुलाचा केला खून, मृतदेह फेकला नदीपात्रात!

'ही मुलं माझी नाही' म्हणत अपंग बापाने 13 वर्षांच्या मुलाचा केला खून, मृतदेह फेकला नदीपात्रात!

आरोपीने आपल्या 13 वर्षांच्या मुलाचा खून केला आणि त्यानंतर मृतदेह नदीपात्रात फेकून दिला होता.

आरोपीने आपल्या 13 वर्षांच्या मुलाचा खून केला आणि त्यानंतर मृतदेह नदीपात्रात फेकून दिला होता.

आरोपीने आपल्या 13 वर्षांच्या मुलाचा खून केला आणि त्यानंतर मृतदेह नदीपात्रात फेकून दिला होता.

    राहुल खंदारे, प्रतिनिधी बुलडाणा, 26 डिसेंबर : संशयाचं भूत डोक्यात शिरलं तर माणूस कधी काय करेल याचा नेम नाही. बुलडाण्यात (buldhana) पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत हे मुलं माझे नाही म्हणत एका अपंग बापाने (father killed his son) मुलाचा खून केल्याची धक्कादायक घटना बुलडाण्यात घडली आहे. या प्रकरणी पत्नीच्या तक्रारीवरून अपंग पतीला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील सवडत इथं ही घटना घडली आहे. सिद्धेश्वर सखाराम नन्हई (वय 40) असं या आरोपीचे नाव आहे. आरोपीने आपल्या 13 वर्षांच्या मुलाचा खून केला आणि त्यानंतर मृतदेह नदीपात्रात फेकून दिला होता. सिद्धेश्वर नन्हई हा दररोज दारू पिऊन पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्यामुळे दोघांमध्ये वाद आणि भांडणं होत होते. या दोघांना 13 वर्षाचा अमर नावाचा मुलगा होता, तर  5 वर्षाची जान्हवी नावाची मुलगी आहे. (हेही वाचा - IND vs SA : द्रविड सीनियर खेळाडूंना बाहेर करण्याच्या तयारीत, कोणाला बसणार धक्का?) पतीने रत्नमाला फिर्याद दिली की, माझ्या चारित्र्यावर संशय घेत मला नेहमी शारीरिक आणि मानसिक त्रास द्यायचा मला दोन अपत्य आहे. माझा पती मला दारू पिऊन ही मुले माझ्या पोटची नाहीत त्यामुळे मी त्यांना संपवून टाकील, अशी नेहमी धमकी देत होता.  मी त्यांना एक दिवस कायमचे संपवून टाकेल त्याला वरती पाठवेल असे म्हणत पत्नीचा नेहमी शारीरिक व मानसिक त्रास देत होता. शुक्रवारी रात्री आरोपी  सिद्धेश्वर आईच्या कुशीत झोपलेल्या 13 वर्षीय मुलाला मध्यरात्री उचलून नेले. आणि त्याचा निर्दयीपणे खून केला. आणि त्यानंतर त्याचा मृतदेह कोराडी नदी पात्रात फेकून दिला. या प्रकरणी पत्नीने पोलीस स्टेशनला तक्रार दिल्याने पोलिसांनी या निर्दयी पित्यास बेड्या ठोकल्या आहेत. (हेही वाचा -शाहिद कपूरच्या पत्नीचा नो ब्लाऊज लुक; PHOTOS पाहून सासुबाईंनी दिली अशी रिअॅक्शन) अपंग असलेला बापाने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पोटच्या गोळ्याचा खून केल्यामु समाजमन सुन्न झाले आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून अधिक तपास पोलीस करत आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या