Home /News /crime /

पत्नीचं शोषण करणाऱ्या बिल्डरची डर्टी कहाणी; फार्म हाऊसमध्ये बार-सेक्स टॉय, न्यूड पार्टीही!

पत्नीचं शोषण करणाऱ्या बिल्डरची डर्टी कहाणी; फार्म हाऊसमध्ये बार-सेक्स टॉय, न्यूड पार्टीही!

या फार्म हाऊसमधून अशा काही गोष्टी समोर आल्या आहेत, ज्या पाहून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल.

    इंदूर, 17 जानेवारी : पत्नीसोबत सामूहिक बलात्काराचा (Gang Rape) आरोप असलेल्या बिल्डरबाबत नवनव्या धक्कादायक बाबी समोर येत आहेत. बिल्डरचा फार्म हाऊस हा अय्याशीचा अड्डा असल्याचं समोर आलं आहे. या फार्म हाऊसमधून महागड्या दारूच्या बाटल्या सापडल्या आहेत. फार्म हाऊसच्या (Farm House) समोर लग्जरियस ऑडी कार उभी होती. कॉटेजदेखील तयार केला आहे. फिरण्यासाठी छोट्या ट्रॅव्हलिंग गाड्या आणि स्पोटर्स सायकल ठेवली होती. फार्म हाऊसमध्ये सेक्स टॉयदेखील मिळाल्या आहेत. फर्निचरपासून ते खोल्यांमध्ये सर्व काही लग्जरियस होते. आरोपी बिल्डर (Indore Builder Farm House Crime) सेक्स महालाच्या आतील दृश्य पाहून कोणाचं ही डोकं (Indore News) सुन्न होईल. आता यावर राज्य सरकारकडून कारवाई करण्यात आली आहे. छत्तीसगडच्या 32 वर्षीय शिक्षिकेसोबत लग्न केल्यानंतर तिच्यावर अत्यंत रानटी वागणूक करणारा बिल्डर राजेश विश्वकर्माच्या फार्म हाऊसवर सुखवस्तू आहेत. खोलीत महागडे बेड, सोफे, कपाटं आणि अन्य सामान देखील ठेवले आहेत. राजेशचा नोकर विपीन या फार्म हाऊसची देखरेख करतो. फार्म हाऊसमध्ये न्यूड पार्टीदेखील होत असल्याचं समोर आलं आहे. मुलींना फार्म हाऊसवर घेऊन येत होते आरोपी... आतापर्यंत पोलिसांच्या तपासानुसार, आरोपी फार्म हाऊसवर मुलींना घेऊन येत होते. आणि त्यांच्यासोबत अय्य़ाशी केली जात होते. अधिकतर तरुणी विपीन आणि अंकेश आणत होते. आरोपीने येथे तरुणींना आणत पार्टी करीत असल्याचं पीडितेने सांगितलं. सेक्स टॉय आणि आर्टिफिशियल हत्यार.. फार्म हाउसवरुन सेक्स टॉय आणि आर्टिफिशियल हत्यारं सापडली आहेत. तपास अधिकाऱ्यांनी सांगितलं की, पोलिसांनी चिनी आर्टिफिशियल चाकू आणि कुऱ्हाडी सेटसह अन्य सामाज जप्त केले आहेत. सामूहिक बलात्काराबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी फार्म हाऊसमधून सापडलेल्या वस्तूंचा तपास केला जात असल्याचं समोर आलं आहे. लवकरच यावर कारवाई केली जाऊ शकते. पोलिसांनी येथील सीसीटीव्ही कॅमेरे आणि डीवीआरदेखील जप्त केले आहेत. याशिवाय आज अटक केलेल्या आरोपींना कोर्टात हजर करण्यात येणार आहे. हे ही वाचा-6 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार करून मृतदेह लपवला घरात; कृत्याने कुटुंब हादरलं हिस्ट्रीशीटर आहेत विपीन भदौरिया चारही आरोपींविरोधात 376 (2जी), 376 (2एन) सह 377, 323, 594, 206 व 25 आर्म्स अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. शेजारच्यांनी सांगितलं की, आरोपी विपीन भदौरिया प्रकाश नगरमध्ये राहतो. त्याच्याविरोधात अनेक तक्रारी दाखल करण्यात आले आहेत. विपीन याला शस्त्रास्त्रांची आवड आहे. त्याने आपल्या फेसबुक प्रोफाइलवर हातात बंदूक घेऊन फोटोही शेअर केली आहे. याशिवाय विपीनच्या वडिलांवरही अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ते उत्तर प्रदेशातील आग्रामध्ये राहतात. कसा झाला खुलासा... मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी मूळत: बिजाघाट, बेमेतरा छत्तीसगड येथील निवासी आहे. तरुणीचं वय 32 वर्षे आहे. शनिवारी तिने शिप्रा पोलीस ठाण्यात पोहोचून गुन्हा नोंदवला. यात सांगितलं की, राजेश विश्वकर्मासोबत मेट्रोमोनियल वेबसाइटवर ओळख झाली होती. यानंतर त्यांच्यात बोलणँ सुरू झालं. यानंतर राजेशने तिच्यासोबत लग्न केलं आणि स्वत:सोबत इंदूरला घेऊन आला. त्याने तिला येथेच फार्म हाऊसवर ठेवलं आणि तिच्यावर अत्याचार करीत होता. तब्बल दीड महिने तिला फार्म हाऊसवर डांबून ठेवलं. येथे न्यूड पार्टी होत होती. याशिवाय कॉल गर्लदेखील आणल्या जात होत्या. तरुणीच्या तक्रारीनंतर 4 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी दोन मुख्य आरोपींना अटक केली आहे.

    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Crime news, Gang Rape, Indore News

    पुढील बातम्या