Home /News /crime /

उमेश कोल्हेच्या हत्येनंतर डिनर पार्टीचं आयोजन; आणखी दोघांना अटक, NIA ला मोठं यश

उमेश कोल्हेच्या हत्येनंतर डिनर पार्टीचं आयोजन; आणखी दोघांना अटक, NIA ला मोठं यश

उमेश कोल्हे हत्याकांडात NIA ने कोर्टात मोठा खुलासा दिला आहे.

    अमरावती, 5 ऑगस्ट : उमेश कोल्हे हत्याकांडात NIA ने कोर्टात मोठा खुलासा दिला आहे. अटक करण्यात आलेला मौलवी मुश्फ़िक अहमद आणि अरबाजने उमेश कोल्हे याच्या हत्येनंतर डिनर पार्टीचं आयोजन केलं होतं. अमरावतीत उमेश कोल्हे हत्या प्रकरणात NIA ने आणि दोन आरोपींना अटक केली आहे. आरोपींमध्ये मौलवी मुश्फ़िक अहमद आणि अब्दुल अरबाज यांचा समावेश आहे. हा आरोपी रहबर NGO मधील एम्बुलन्सचा ड्रायव्हर आहे. NIA ने आज जेव्हा दोन्ही आरोपींना कोर्टात हजर केलं तर कोर्टाला सांगितलं की, या आरोपींमध्ये उमेश कोल्हे हत्याकांडचा  मास्टर माइंड इरफ़ान खान आणि दुसऱ्या आरोपींना लपवण्यासाठी मजत केली होती. मिळालेल्या माहितीनुसार, मौलवी अहमद यांनीच कोल्हे यांच्या हत्येचा प्लान आखला होता. त्यांना यासाठी कतार आणि कुवैतमधून निधी पुरवला जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अटक केलेले दोन्ही आरोपी इरफान शेख, शोएब खान, मुदस्सिर अहमद, आतिफ राशिद, यूसुफ खान, अब्दुल तौफीक आणि शाहरुख पठा,न वांछित आरोपी शमीम अहमद, फिरोज अहमद यांच्यासोबत काम करीत होते. आतापर्यंत या प्रकरणात 9 आरोपींना अटक करण्यात आली आहे. याशिवाय NIA ने सांगितलं की, या आरोपींमध्ये उमेश कोल्हेच्या हत्येनंतर डिनर पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीत आणखी अनेकांना बोलवण्यात आलं होतं. या पार्टीत कोणाकोणाचा समावेश होता, याबाबत एनआयएला माहिती आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Crime, Gang murder, Nia, अमरावतीamravati

    पुढील बातम्या