धनबाद 23 जून: पैश्यांसाठी माणसं कुठल्या थराला जातील याचा काही नेम नाही. वडिलांच्या पैशावर मौजमजा करणाऱ्या एका नातवाने आजोबांची नोकरी मिळविण्यासाठी त्यांची निघृण हत्या (Murder) केली. त्यासाठी त्याने हत्येची सुपारीही ( supari killing ) दिली होती. प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या नातवाला पोलिसांनी हिसका दाखविताच त्याने सगळा गुन्हा कबूल केला. झारखंड () मधल्या धनबाद जिल्ह्यातल्या या घटनेने सर्व परिसर हादरून गेला आहे.
नरेश नोनिया हे धनबादजवळ नोकरीला होते. त्यांचा नातू अनिल हा त्यांचा लाडका होता. मात्र अनिल हा फाारसा कष्ट करणारा नव्हता. त्याचा आजोबांच्या नोकरीवर डोळा होता. त्याला आजोबाच्या नोकरीवर अनुकंपा तत्वावर जायचं होतं. त्यासाठी त्याने आजोबांनाच संपविण्याचा निर्णय घेतला.
अनिलने आजोबांच्या हत्येची सुपारी काही मारेकऱ्यांना दिली. घटनेच्या दिवशी त्याने आजोबांना ऑफिमध्ये मोटसायकलने आणून सोडलं. नंतर तो मारेकऱ्यांना घेऊन आला आणि त्या तिघांनी मिळून आजोबांची हत्या केली.
खेळता खेळता पाझर तलावाकडे वळले पाय, एकाच कुटुंबातील पाच मुलींचा बुडून मृत्यू
त्यानंतर ते सगळे त्यांच्या गावी परतले. पोलिसांच्या चौकशीत अनिलचा व्यवहार हा संशयास्पद असल्याचं जाणवलं आणि पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्हा कबूल केला. पोलिसांनी मारेऱ्यांना पकडण्यासाठी शोध घेत आहेत. हत्येमागे इतर काही कारण आहे का त्याचाही पोलीस शोध घेत आहेत.
संपादन - अजय कौटिकवार
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.