नितिन कुमार (मथुरा), 25 मार्च : उत्तर प्रदेशच्या मथुरा येथे ढाबा ऑपरेटरचा खून झाला होता. दरम्यान ऑपरेटरच्या खून प्रकरणाचा खुलासा करत मथुरा पोलिसांनी मृताच्या भावासह 4 आरोपींना अटक केली आहे. तसेच अद्यापही फरार आरोपी आहेत त्यांचा शोध पोलीस घेत आहेत. त्यांच्याकडून 3 बेकायदेशीर पिस्तूल आणि 28 हजार रुपये पोलिसांनी जप्त केले आहेत. हा खून भावानेच मालमत्ता आणि पैशाच्या लालसेपोटी केला असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी हाच भाऊ पोलीस ठाण्यात जात, इतर नातेवाईकांवर एफआयआर दाखल केला होता.
उत्तर प्रदेशच्या सलेमपूर गावातील रहिवासी लखन सिंग यांची 17 मार्च रोजी अज्ञात मोटरसायकलवरून आलेल्या हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. दरम्यान मागच्या काही दिवसांपासू पोलीस मारेकऱ्यांचा शोध घेत होते. गुन्हा केल्यानंतर दुचाकीस्वार चोरटे घटनास्थळावरून पसार झाले होते.
ऑनलाईन खरेदी करताय? जरा थांबा! दोघांना लाखो रुपयांना बसला गंडा
घटनेनंतर मृताचा भाऊ सुरेंद्र याने बंटी, हिमांशू, नरपत आणि त्याची मावशी इंद्रा यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला होता. एफआयआर दाखल करणाऱ्या सुरेंद्रने भाऊ लखनची सुपारी देऊन त्याची हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेंद्रने त्याचा भाऊ लखन याच्या हत्येची सुपारी उदल नावाच्या गुन्हेगाराला दिली होती. गुंड उदलने हत्येचे नियोजन करत खून केला. या घटनेत घरातील व्यक्ती मानवेंद्र याचाही सहभाग होता. मानवेंद्रने आपल्या साथीदार कान्हा आणि अंशूला या कटात सहभागी करून घेतले. 17 मार्च रोजी मानवेंद्र, कान्हा आणि अंशू लखन सिंगच्या ढाब्यावर पोहोचले. त्यानंतर कान्हा आणि अंशूने त्यांनी आणलेल्या पिस्तुलाने गोळीबार करून लखनची हत्या केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशीत लखनचा भाऊ सुरेंद्र याने हे काम करण्यासाठी 3 लाख रुपये आणि 100 चौरस यार्ड जमीनीचा तुकडा सुपारी म्हणून दिल्याचे निष्पन्न झाले. सुरेंद्रने बिरजापूर गावात बांधलेले वडिलोपार्जित घर 88 लाख रुपयांना विकून पैसे स्वतःकडे ठेवले होते.
धक्कादायक! अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या पथकावर भंडाऱ्यात कुऱ्हाडीने हल्ला, वाहन पेटवण्याचा प्रयत्न
लखनने आपला वाटा मागितल्यावर सुरेंद्रने आपल्या भावाला जागा न देण्यासाठी ही हत्या केल्याचे बोलले जात आहे. त्यासाठी चार शार्पशुटरर्सना 55 हजार रुपये आगाऊ व नंतर एक लाख रुपये अधिक देण्याची हमी देत हत्या केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Local18, Murder, Uttar pradesh