मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

मूल होत नसल्याच्या नैराश्यातून आत्महत्या; लग्नाला झालं होतं फक्त एक वर्ष

मूल होत नसल्याच्या नैराश्यातून आत्महत्या; लग्नाला झालं होतं फक्त एक वर्ष

लग्नानंतर मूल होत नसल्याच्या नैराश्यातून एकाने आत्महत्या (suicide) केल्याची धक्कादायक घटना येथील कुकुटपल्ली परिसरात उघडकीस आली आहे. कुकटपल्ली (Kukatpally Hyderabad) पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

  • Published by:  News18 Desk

हैदराबाद, 19 मे : लग्नानंतर मूल होत नसल्याच्या नैराश्यातून एकाने आत्महत्या (suicide) केल्याची धक्कादायक घटना येथील कुकुटपल्ली परिसरात उघडकीस आली आहे. कुकटपल्ली (Kukatpally Hyderabad) पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार आत्महत्या केलेला राहुल (वय 34) आणि त्याची पत्नी रम्या यांचा वर्षभरापूर्वी विवाह झाला होता. हे दोघे केपीएचबी कॉलनी येथील वसंतनगर भागात एका अपार्टमेंटमध्ये राहत होते. लग्न होऊन एक वर्ष होऊन गेले तरीही मूल होत नसल्याने दोघेही तणावामध्ये होते. त्यांनी मूल होण्यासाठी अनेक डॉक्टरांचा सल्ला घेतला होता आणि औषध उपचारही सुरू होते. त्यातच राहुलला अगोदरपासूनच मनोविकार (सायकोसिस psychosis) होता.

सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे मूल होण्याच्या ट्रीटमेंटसाठी रुग्णालयात (fertility centre) जायचे होते. राहुलच्या पत्नीने त्याला सोबत येण्यास विनंती केली. मात्र, तिच्या बोलण्यावरून तो संतापला आणि रागाच्या भरात घरातून बाहेर पडला. त्यामुळे त्याच्या पत्नीला चिंता लागली होती की, हा नेमका कुठे गेला असेल आणि ती रात्रभर त्याच्या परतण्याची वाट पाहत होती. मात्र, तो घरी आलाच नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी शेजारच्या घरातून जोरात किंचाळण्याचा आवाज आल्यानंतर पत्नी रम्या धावत तेथे गेली असता राहुलने शेजाऱ्यांच्या घरात दोरीने पंख्याला गळफास घेतल्याचे दिसून आले. ते दृश्य पाहून तिला धक्काच बसला. राहुलने शेजारच्या घरात स्वयंपाक घरामध्ये छताच्या पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली होती.

हे  वाचा - अंथरूणाला खिळली लेक, लॉकडाऊनमुळे हाती पैसाही नाही; 2 वेळेच्या जेवणासाठी अभिनेत्रीवर ओढावली पुरस्कार विकण्याची वेळ

हे वाचा - धक्कादायक! मृत्यूनंतरही कोरोनाग्रस्तावर 3 दिवस उपचार, पैसे उकळण्यासाठी नांदेडच्या डॉक्टरांचा प्रताप

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर कुकटपल्ली पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून माहिती घेतली. राहुलने आत्महत्या का केली असावी याबाबत पत्नीसह इतर शेजारील लोकांच्याकडे त्यांनी चौकशी केली. अद्याप पोलीस या घटनेची सखोल चौकशी करत आहेत.  या घटनेत राहुलने शेजारच्या घरात जावून आणि तेही स्वयंपाक घरात आत्महत्या केल्यानं आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

First published:

Tags: Crime news, Husband suicide, Hyderabad