Home /News /crime /

6 महिन्यांपासून प्लानिंग; घराचं गॅस चेंबर; आई-लेकींनी सुसाइड केलेल्या त्या रहस्यमय घरात नेमकं काय घडलं?

6 महिन्यांपासून प्लानिंग; घराचं गॅस चेंबर; आई-लेकींनी सुसाइड केलेल्या त्या रहस्यमय घरात नेमकं काय घडलं?

आई व दोन तरुण मुलींच्या आत्महत्येच्या वृत्ताने अख्ख्या देशाला धक्का बसला होता. जाणून घ्या आत्महत्येच्या वेळी त्या घरात नेमकं काय घडलं?

    नवी दिल्ली, 23 मे : साउथ दिल्लीतील वसंत विहारमधील एका फ्लॅटमध्ये आई आणि दोन मुलींच्या मृतदेहाशेदारी सापडलेल्या सुसाइड नोटमधून ही सामूहिक आत्महत्या (Vasant Vihar Suicide Case) असल्याचं समोर आलं आहे. आत्महत्येपूर्वी आई आणि दोन्ही मुलींना आपल्या घराला गॅस चेंबर बनवलं होतं. घराची सर्व दारं, खिडक्या प्लास्टिकच्या पिशव्यांनी सील केली होती. गॅस सिलिंडरचा नॉब उघडा होता. तिघांच्या तोंडातून फेस आणि रक्त निघत होता. मृत्यूपूर्वी विषारी पदार्थाचं केलं होतं सेवन... मिळालेल्या माहितीनुसार, आत्महत्येपूर्वी तिघांनी काहीतरी विषारी पदार्थ खाल्ला होता. म्हणूनच गॅसमुळे श्वास गुदमरल्यानंतरही त्यांनी आरडाओरडा केला नाही. त्यांनी एक नोटमध्ये लिहिलं होतं की, घराच्या आत विषारी गॅस आहे. दरवाजा उघडताच लायटर वा माचिक पेटवू नका. पोलिसांना मंजू श्रीवास्तव (55) आणि त्यांच्या दोन मुली अंकिता (30) आणि अंशुता (26) यांचे मृतदेह शनिवारी रात्री सापडले होते. घरात सापडलेल्या 10 पानी सुसाइड नोटमध्ये लिहिलं होतं की...ज्या जगात आम्ही जात आहोत. तेथे जाऊन आम्ही पुन्हा एकत्र येऊ. शेजारच्यांनी सांगितलं की, पती उमेशच्या मृत्यूनंतर मंजू आणि दोन्ही मुली नैराश्यात होत्या. तिघींचं उमेशवर खूप प्रेम होतं. आई आणि मोठी मुलगीदेखील बऱ्याच दिवसांपासून आजारी होती. याशिवाय कुटुंबीय आर्थिक अडचणींचा सामना करीत होता. यातून त्यांनी आत्नहत्येचं पाऊल उचलल्याची शक्यता आहे. स्वत:चा जीव घेतला मात्र, लोकांना सावध केलं... शुक्रवारी सायंकाळी मुलीने दूध देणाऱ्याला शनिवारी दूध न आणण्यास सांगितलं. सुसाइड नोटपैकी एक नोट त्यांनी दार उघडताच समोर लावली होती. त्यात लिहिलं होतं की, दार उघडताच कोणतंही स्विच ऑन करू नका. आणि माचिस पेटवू नका. घराच्या आत कार्बन मोनो ऑक्साइड परसली आहे. ही आधी बाहेर काढा त्यानंतरच आत या. अन्यथा ही तुमच्यासाठी घातक ठरू शकते. नोट वाचताच घरात शिरणारे पोलीसही भावुक झाले. आत्महत्या करीत असताना त्यांनी दुसऱ्यांच्या जीवाची पर्वा केली. सहा महिन्यांपूर्वी केली होती आत्महत्येची प्लानिंग.. मिळालेल्या माहितीनुसार, येथे 206 आणि 207 फ्लॅट आहेत. त्यातील 206 हा फ्लॅट भाड्याने दिले होता. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात हा फ्लॅट रिकामी करण्यात आला होता. याचा नोटमध्ये उल्लेख आहे. भाडेकरूंवर संशय जाऊ नये यासाठी त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी भाडोत्रींना काढलं होतं. याचा अर्थ सहा महिन्यांपूर्वी पासून तिघी जणी आत्महत्येची प्लानिंग करीत होत्या.

    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Delhi, Mother, Suicide

    पुढील बातम्या