मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

राजधानी दिल्ली हादरली! गुंडांकडून महिलां-मुलांना बेदम मारहाण, गोळीबार करत गाड्यांची तोडफोड

राजधानी दिल्ली हादरली! गुंडांकडून महिलां-मुलांना बेदम मारहाण, गोळीबार करत गाड्यांची तोडफोड

गुंडांचा एक गट काही माणसांना शोधत होतो तर दुसऱ्या गटानं वाहनांची तोडफोड केली.

गुंडांचा एक गट काही माणसांना शोधत होतो तर दुसऱ्या गटानं वाहनांची तोडफोड केली.

गुंडांचा एक गट काही माणसांना शोधत होतो तर दुसऱ्या गटानं वाहनांची तोडफोड केली.

  • Published by:  Kranti Kanetkar

नवी दिल्ली, 17 ऑगस्ट : राजधानी दिल्लीमध्ये गुंडांनी थैमान घातलं आहे. रात्री उशिरा परिसरात गोळीबार करत गाड्यांची मोठ्या प्रमाणात तोडफोड केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उत्तर दिल्लीतील काश्मिरी गेटच्या मोरी गेट कुचा मोहतर खान येथे रात्री उशिरा जवळपास 10 ते 12 गुंडांनी गोळीबार केला. त्यानंतर रस्त्यावरील गाड्यांची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली. जवळपास असलेल्या घरांमध्ये घुसून महिला आणि लहान मुलांना बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे.

गुंडांच्या या हैदोसामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे. स्थानिकांनी दिल्ली पोलिसात यासंदर्भात अज्ञात गुंडांविरोधात तक्रार दाखल केली आहे. उत्तर दिल्लीत मध्य रात्रीच्या सुमारास गुंडांनी दुचाकी, चारचाकी मिळेल त्या वाहनांची काठ्या आणि रॉडच्या सहाय्यानं तोडफोड केली आहे.

हे वाचा-पाण्यात उडी मारण्याचा स्टंट बेतला जीवावर, तरुणासोबत काय घडलं पाहा VIDEO

गुंडांचा एक गट काही माणसांना शोधत होतो तर दुसऱ्या गटानं वाहनांची तोडफोड केली. त्यानंतर हवेत गोळीबारही केला. या प्रकऱणी अद्याप कोणतंही सीसीटीव्ही फुटेज मिळू शकलं नाही. या गुंडांनी जवळच्या घरांमध्ये घुसखोरी करून महिला आणि लहान मुलांना बेदम मारहाण देखील केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी दिल्ली पोलिसांकडून तपास सुरू असून अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

First published:

Tags: Delhi