नोकरीसाठी 2 गटांमध्ये तुफान मारामारी, एकमेकांवर चाकूनं केला 39 सपासप वार

नोकरीसाठी 2 गटांमध्ये तुफान मारामारी, एकमेकांवर चाकूनं केला 39 सपासप वार

दिल्ली (Delhi) मधल्या सफदरजंग भागात नोकरी मिळवण्याच्या ताणामुळे तरुणांच्या दोन गटांमध्ये चाकूनं मारामारी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. यावेळी झालेल्या मारामारीत दोन्ही गटांनी एकमेकांवर चाकूनं तब्बल 39 वार केले. या प्रकरणात एका तरुणाचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली,12 डिसेंबर:   जास्त लोकसंख्या आणि कमी संधी यामुळे नोकरी मिळवण्यासाठी इच्छूक उमेदवार ‘वाट्टेल तो’ खटाटोप करतात. कोरोना (COVID19) काळात तर नोकरीच्या संधी आणखी कमी झाल्यानं हा संघर्ष आणखी वाढला आहे. नोकरी मिळवण्याच्या ताणामुळे तरुणांच्या दोन गटांमध्ये चाकूनं मारामारी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. यावेळी झालेल्या मारामारीत दोन्ही गटांनी एकमेकांवर चाकूनं तब्बल 39 वार केले. या प्रकरणात एका तरुणाचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत.

दिल्ली (Delhi) मधल्या सफदरजंग भागात हा चाकूबाजीचा प्रकार घडला आहे. या प्रकरणात पोलिसांनी तीन तरुणांना अटक केली असून यामध्ये एक अल्पवयीन आहे. सफदरजंग हॉस्पिटलमध्ये (Safdarjung Hospital) ‘कंत्राटी पद्धतीवर नोकरी करण्याच्या मुद्यांवर तरुणांच्या दोन गटांमध्ये वादावादी झाली आणि या वादावादीचं रुपांतर मारामारी आणि चाकू हल्ल्यात झालं’, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

नोकरीसाठी  मारामारी

पोलिसांच्या तपासात उघड झालेल्या माहितीनुसार, नीरज आणि मुकेश हे दोन तरुण बऱ्याच दिवसांपासून सफदरजंग हॉस्पिटलमध्ये एका कंपनीच्या मार्फत कंत्राटी कामगार होते. कृष्णा, रवी आणि त्यांच्या मित्रांनाही हॉस्पिलमध्ये काम करण्याची इच्छा होती. मात्र, त्यांच्या नोकरीचं काम काही होत नव्हतं.

हे वाचा-12 तास उलटले पण कुणीच बॅग नेण्यासाठी आलं नाही, कराड स्थानकावर थरारक घटना VIDEO

हे सर्व तरुण दोन दिवसांपूर्वी रात्री एकत्र पार्टी करत होते. त्यावेळी नोकरी करण्याच्या मुद्यावर त्यांच्यात वादावादी सुरु झाली. या भांडणाच्या दरम्यान कृष्णानं चाकूनं हल्ला केला. या हल्ल्यात तीन जण गंभीर जखमी झाले. त्यानंतर कृष्णा फरार झाला. जखमींना तातडीनं हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. हॉस्पिटलमधील उपचाराच्या दरम्यान नीरजचा मृत्यू झाला.

या प्रकरणातला मुख्य आरोपी कृष्णाला पोलिसांनी अटक केली आहे. त्याचबरोबर रवी आणि आणखी एका अल्पवयीन मुलाला देखील ताब्यात घेण्यात आलं आहे. या सर्व आरोपींवर हत्या करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Published by: News18 Desk
First published: December 12, 2020, 9:28 AM IST
Tags: crimedelhi

ताज्या बातम्या