Home /News /crime /

बापरे! चोरी करण्यासाठी विमानाने प्रवास, हायटेक गँगने लंपास केल्या 500 गाड्या

बापरे! चोरी करण्यासाठी विमानाने प्रवास, हायटेक गँगने लंपास केल्या 500 गाड्या

हे चोरटे गाड्या चोरण्यासाठी फ्लाईटने दिल्लीत येत असत आणि चोरी झाल्यावर त्याच गाडीत बसून ते फरार होत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

    नवी दिल्ली 27 जुलै: राजधानी दिल्लीत पोलिसांनी (Delhi Police)  एका हाय प्रोफाईल हायटेक गँगचा (High Tech Thieves Gang)  पर्दाफाश केला आहे. कारची चोरी करून ही गँग त्या गाड्या विकून पैसे कमावत होती. गेल्या ही वर्षात या गँगने तब्बल 500 कार्सची चोरी केल्याचं उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. दिल्ली आणि हरियाणातून या गाड्यांची चोरी करून  त्या गाड्यांची इतर राज्यांमध्ये विक्री केली जात असे. हे चोरटे गाड्या चोरण्यासाठी फ्लाईटने दिल्लीत येत असत आणि चोरी झाल्यावर त्याच गाडीत बसून ते फरार होत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हे चोरटे इन्शुरन्स कंपनीकडून अपघाताच्या गाड्या कमी भावात विकत घेत आणि त्याच्या नंबर प्लेट बदलवून त्याची महागड्या किंमतीत विक्री करत असे. या गँगचे धागे दोरे हे देशातल्या इतर राज्यांमध्येही पसरले आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. अशा प्रकारच्या गँगची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी एका विशेष टीमची स्थापना केली होती. त्या टीमला मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी या गँगमधल्या एका भामट्याला अटक केली होती. त्याकडून काही धागेदोरे मिळ्याने पोलिसांनी माग काढत या गँगच्या सदस्यांना अटक केली. ट्रिपल मर्डरने शहर हादरलं, एकाच कुटुंबातल्या 3 जणांची गोळी मारून हत्या या गँगमधला एक सदस्य हा मणिपूरमधला असून त्याची पत्नी ही हेड कॉस्टेबल आहे अशी माहितीही पोलिसांनी दिली आहे.  या गँगचं देशातलं कनेक्शन शोधण्यासाठी पोलिसांनी आता चौकशीला सुरुवात केली आहे. संतापजन! अल्पवयीन मुलीची बलात्कारानंतर निर्घृण हत्या, रायगड हादरलं या गँगने अलिशान गाड्यांची चोरी केल्याचंही आढळून आलं आहे. विमानाने प्रवास करायचा. शहरातल्या पॉश भागात आणि पार्किंग असलेल्या ठिकाणी पाळत ठेवायची आणि संधी मिळेल तशा गाड्या पळवायच्या असा त्यांचा प्रयत्न असायचा. त्यासाठी त्यांच्याकडे हायटेक उपकरणेही होती. गाडी चोरून त्याच गाडीने ते अवघ्या काही तासांमध्ये शहराबाहेर जात आणि गाडीची नंबर प्लेट बदलून टाकत असे. त्यामुळे लगेच ती गाडी ओळखणे अवघड होऊन जात असे. आता त्यांच्याकडून धक्कादायक माहिती मिळण्याची शक्यता असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    पुढील बातम्या