Home /News /crime /

दर 15 मिनिटाला दरोडा; विरोध केल्यास करायचे हत्या, अखेर सराईत चोरांची टोळी गजाआड

दर 15 मिनिटाला दरोडा; विरोध केल्यास करायचे हत्या, अखेर सराईत चोरांची टोळी गजाआड

ही टोळी प्रत्येक पंधराव्या मिनिटाला एका ठिकाणी चोरी करायची. इतकंच नाही तर त्यांचा विरोध केल्यास ते माणसांची हत्याही (Murder) करायचे.

    नवी दिल्ली 13 जून : चोरांच्या एका टोळीनं पोलिसांला घाम फोडला. ही टोळी उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) ट्यूबवेलमधून निघून 50 किलोमीटरचं अंतर पार करत सेन्ट्रो कारनं दिल्लीला जायची आणि प्रत्येक पंधराव्या मिनिटाला एका ठिकाणी चोरी करायची. इतकंच नाही तर त्यांचा विरोध केल्यास ते माणसांची हत्याही करायचे. या टोळीची दहशत इतकी वाढली होती, की यांनी पकडण्यासाठी क्राइम ब्रान्च (Crime Branch), स्पेशल सेल आणि सगळ्या जिल्ह्यातील पोलीस कामाला लागले होते. अखेर आता दिल्लीच्या नॉर्थ वेस्ट पोलिसांनी (Delhi Police) या टोळीला पकडण्यात यश आलं आहे. पोलिसांनी यूपीमधील वेगवेगळ्या भागांमध्ये जात या टोळीला पकडलं असून जळालेल्या अवस्थेतील ती कारही जप्त केली आहे, ज्यात बसून ही टोळी दिल्लीला यायची आणि चोरी करून फरार व्हायची. पोलिसांपासून वाचण्यासाठी हे लोक एकदम शांत अशा निर्मनुष्य ठिकाणी ट्यबवेलमध्ये शिरुन झोपी जात असत. नागपूरात तरुणानं YouTubeवर बघून बनवला बॉम्ब; पण निकामी करता न आल्यानं घडलं भलतंच ३ जणांची ही टोळी हत्यारं सोबत घेऊन सेन्ट्रो कारनं दिल्लीकडे यायचे आणि रात्रीच्या अंधारात जो कोणी यांच्यासमोर येईल, त्याला लुटायचे. या चोरांनी आठ जूनला रात्री सर्वात आधी पंजाबी बाग परिसरात चोरीचा विरोध करणाऱ्या ट्रक चालकाची हत्या केली. त्यांनी दिल्लीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी चोरी, चोरीचा प्रयत्न आणि तक्रार करण्यांवर गोळी झाडून त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. त्यादिवशी अवघ्या दीड तासात या चोरांनी ४ गुन्हे केले आणि लुटलेल्या सामानासोबत ते यूपीला परतले. दीड तासात झालेल्या चोरीच्या चार घटना आणि एका हत्येनं दिल्ली पोलिसही हादरले. सौंदर्यवतीचा प्रताप, अश्लिल व्हिडिओ तयार करून व्यापाऱ्याचे Blackmailing या चोरांनी पोलिसांपासून वाचण्यासाठी या घटनेनंतर आपली सेन्ट्रो कारही जाळली. मात्र, पोलिसांनी ही कार जप्त केली. यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे चोरांची ओळख पटवली. यानंतर ट्यूबवेलपर्यंत पोहोचत पोलिसांनी या तीनही चोरांना अटक केली.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Crime news, Thief

    पुढील बातम्या