Home /News /crime /

आधी अडवली कार मग...कॉन्स्टेबलचं पिस्तुल काढून झाडली गोळी, दिल्लीतील थरकाप उडवणारा VIDEO

आधी अडवली कार मग...कॉन्स्टेबलचं पिस्तुल काढून झाडली गोळी, दिल्लीतील थरकाप उडवणारा VIDEO

शहरातील बाबा हरिदास नगर परिसरात पिस्तुलीच्या धाक दाखवून भररस्त्यावर तरुणांना मारहाण केली आणि गोळीबार केला.

  नवी दिल्ली, 01 नोव्हेंबर : दिल्ली पोलीस (Delhi Police)दलातील एका कॉन्स्टेबलचा भयंकर प्रताप समोर आला आहे. पोलीस कॉन्स्टेबलच्या मित्राने पिस्तुलीच्या धाक दाखवून भररस्त्यावर तरुणांना मारहाण केली आणि गोळीबार केला. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ (cctv video)समोर आला आहे.

  ही घटना 29 ऑक्टोबर रोजी रात्री 11.15 च्या सुमारास घडली. शहरातील बाबा हरिदास नगर परिसरात कॉन्स्टेबल सुरेंद्र याच्या काही मित्रांनी कारमधील तरुणांना बेदम मारहाण केली. वाद विकोपाला गेल्यानंतर संतापलेल्या या तरुणांनी एका जणावर गोळीबार केला.

  या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसतंय की, एक सॅन्टरो कार थांबवण्यात आली आहे. कारचे मागील दार उघडून एका तरुणाला लाथा बुक्याने मारहाण करण्यात आली. दुसरा तरुण हा सोडवण्यासाठी गेला असता त्यालाही मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्याच्यावर गोळी झाडण्यात आली. हा गोळीबार सुरेंद्र यांच्या एका साथीदाराने केला. ज्या पिस्तुलीतून गोळीबार करण्यात आला होता, ती सुरेंद्र याची सेवेतील पिस्तुल असल्याचे समोर आले आहे.  फिर्यादीची सुरेंद्रच्या मित्रासोबत वाद झाला होता, त्यातून ही घटना घडली. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी कॉन्स्टेबल सुरेंद्रसह त्याच्या मित्राला अटक केली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
  Published by:sachin Salve
  First published:

  पुढील बातम्या