नवी दिल्ली 24 जुलै : दिल्लीच्या (Delhi) महिपालपूरमधून (Mahipalpur) पहाटे 4 वाजून 9 मिनिटांनी वसंत कुंज नॉर्थ ठाण्यात एक फोन आला. हा फोन पीसीआरमध्ये तैनात हेड कॉन्स्टेबल विनोद यांचा होता. त्यांनी ड्यूटी ऑफिसरला सांगितलं, की एक व्यक्ती हत्या (Murder) करून मृतदेह (Dead Body) रिक्षातून घेऊन जात होता. त्याला त्यांनी पकडलं आहे. यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी (Delhi Police) पाहिलं, की रिक्षामध्ये एक मृतदेह होता. मृतदेहाच्या अंगावर निळ्या रंगाचा शर्ट, निळ्या रंगाचं लोवर आणि काळ्या रंगाचे शूज होते. मात्र, मृतदेहाजवळ असं काहीही आढळलं नाही ज्यानं त्याची ओळख पटवता येईल.
इंटरनेटवर पॉर्न पाहणाऱ्यांची संख्या चारपट वाढली;महिला आणि वृद्धांनाही मोह आवरेना
एकंदरीत राहणीवरुन मृत व्यक्ती चांगल्या कुटुंबातील असल्याचं जाणवलं. या व्यक्तीच्या जवळ इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्टच्या पार्कींगची (Airport Parking) एक स्लिप आढळून आली. पोलीस आता या मृत व्यक्तीची ओळख त्याच्या हातावर असलेल्या टॅटूवरुन (Tattoo) पटवण्याचा प्रयत्न करत आहेत. या व्यक्तीच्या हावारक हिंदीमध्ये 'महाकाल' असं लिहिलं गेलं आहे.
धक्कादायक! नागपुरात तरुणांचा दारू पिऊन राडा; विरोध करणाऱ्यावर थेट गोळ्या झाडल्या
दिल्ली पोलिसांनी हा मृतदेह रिक्षामधून घेऊन जाणाऱ्या सुरमेश नावाच्या आरोपीला अटक केली आहे. आरोपीनं पोलिसांना सांगितल, की तो एका बिल्डिंगमध्ये गार्ड म्हणून काम करतो. 22 आणि 23जुलैच्या मध्यरात्री तो बेसमेंटमध्ये होता, तेव्हा एक व्यक्ती दारूच्या नशेत तिथे आला आणि सुरमेशसोबत वाद घालू लागला. यानंतर रागात सुरमेशनं त्याला धक्काबुक्की केली, यातच तो खाली कोसळला. आरोपीनं सांगितलं, की यानंतर भीतीमुळे त्यानं या व्यक्तीची गळा दाबून हत्या केली. दिवसभर हा मृतदेह बेसमेंटमधील एका खोलीत ठेवण्यात आला आणि यानंतप मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तो रिक्षामधून घेऊन जाण्याचं त्यानं ठरवलं. इतक्यात पोलिसांची नजर त्याच्यावर गेली. पोलिसांनी मृतदेह सफदरगंज रुग्णालयात ठेवला असून हातावरील टॅटू आणि पार्कींग स्लिपच्या माध्यमातून आरोपीची ओळख पटवली जाणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Delhi, Murder news