मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

Delhi Murder Case : घरात पडला रक्ताचा सडा; मुलाने ड्रग्ससाठी आई, वडील, आजी आणि बहिणीलाही सोडलं नाही!

Delhi Murder Case : घरात पडला रक्ताचा सडा; मुलाने ड्रग्ससाठी आई, वडील, आजी आणि बहिणीलाही सोडलं नाही!

 व्यसनाच्या आहारी गेलेल्या तरूणाने अत्यंत धक्कादायक कृत्य केल्याने खळबळ उडाली आहे. नशेत आपल्याच कुटुंबातील चौघांची हत्या केल्याचे समोर आले आहे.

व्यसनाच्या आहारी गेलेल्या तरूणाने अत्यंत धक्कादायक कृत्य केल्याने खळबळ उडाली आहे. नशेत आपल्याच कुटुंबातील चौघांची हत्या केल्याचे समोर आले आहे.

व्यसनाच्या आहारी गेलेल्या तरूणाने अत्यंत धक्कादायक कृत्य केल्याने खळबळ उडाली आहे. नशेत आपल्याच कुटुंबातील चौघांची हत्या केल्याचे समोर आले आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Delhi, India
  • Published by:  Sandeep Shirguppe

नवी दिल्ली, 23 नोव्हेंबर : देशभरात मागच्या काही दिवसांपासून हत्याकांडाच्या घटनांमुळे हादरवून टाकणाऱ्या घटना घडत आहेत. आफताब आणि श्रद्धात हत्या प्रकरण ताजे असतानाच पुन्हा एकदा दिल्लीतून नवे प्रकरण समोर आले आहे. व्यसनाच्या आहारी गेलेल्या तरूणाने अत्यंत धक्कादायक कृत्य केल्याने खळबळ उडाली आहे. नशेत आपल्याच कुटुंबातील चौघांची हत्या केल्याचे समोर आले आहे. 

ही घटना राजधानी दिल्लीतील पालम परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणात पोलिसांनी आरोपी केशवला (वय 25) अटक केली आहे. व्यसन करण्यासाठी पैशाचा घरी तगादा लावला होता त्याला विरोध केल्याने रागातून आरोपी केशवने वडील दिनेश (वय 50), आई दर्शना, बहीण उर्वशी (वय 18) तसेच आजी दीवाना देवी यांची (वय 75) राहत्या घरी धारदार शस्त्राने हत्या केली.

हे ही वाचा : श्रद्धाची हत्या गळा दाबून नाही तर.. दिल्ली पोलिसांची नवीन थिअरी, घटनेची मोठी अपडेट

पोलिसांकडून (Delhi Murder Case) मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार आरोपी केशव हा नेहमी व्यसन करायचा. त्याचे व्यसन सोडवण्यासाठी कुटुंबियांनी त्याला व्यसनमुक्ती केंद्रात दाखल केले होते. काही दिवसांपूर्वीच कुटुंबियांनी त्याला घरी आणले होते. परंतु, व्यसनमुक्ती केंद्रात देखील त्याचे व्यसन सुटले नव्हते. व्यसन करण्यासाठी तो कुटुंबियांच्या मागे पैशांची मागणी करायचा. दरम्यान काल (दि. 22) त्याने व्यसनासाठी कुटुंबियांकडे पैसे मागितले.

परंतु, घरच्यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने केशवने कुटुंबीयांची हत्या करण्याचा निर्णय घेतला. घरातील चारही सदस्यांना वेगवेगळ्या खोलीत घेवून जात त्याने त्यांची हत्या केली. हत्येनंतर पसार होण्याच्या तयारीत असताना आरोपीला इतर लोकांच्या मदतीने त्याच्या चुलत भावाने पकडले.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार रात्री साडे दहाच्या सुमारास केशवच्या घरातून भांडणाचा आवाज येत होता. काही वेळानंतर केशवच्या चुलत भावाने बहिणीच्या ओरडण्याचा आवाज ऐकला. यानंतर तो आजूबाजूच्या लोकांना घेवून घरी पोहचला. परंतु, आरोपीने दरवाजा आतून बंद केला होता. यावेळी घराचे दार ठोठावल्यानंतर केशवने हे घरघुती भांडण असल्याचे सांगितले.

हे ही वाचा : श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे कुठे कुठे ठेवले; आफताबने ठेवलाय हिशोब, धक्कादायक माहिती उघड

लोकांनी त्यामुळे काही वेळ वाट बघितली. परंतु, अचानक आरोपी पळू लागला, तेव्हा लोकांनी त्याला पकडले. लोकांनी जेव्हा घरी जाऊन बघितले. तेव्हा घराची फरशी रक्ताने माखली होती. आजूबाजूला चार मृतदेह पडले होते. आरोपी केशव गुरुग्राम मधील एका कंपनीत कामाला होता. एक महिन्यापूर्वीच त्याने नोकरी सोडली होती. नोकरी सोडल्यानंतरच तो घरच्यांकडे व्यसनासाठी पैशांचा तगादा लावत होता. व्यसनाधीन मुलाने व्यसनाच्या आहारी जात अवघे कुटुंब संपवल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

First published:

Tags: Crime news, Delhi, Delhi News, Delhi Police