सामूहिक बलात्काराचा प्लानिंग करत होते शाळकरी मुलं, इन्स्टाग्राम चॅट झालं लिक

सामूहिक बलात्काराचा प्लानिंग करत होते शाळकरी मुलं, इन्स्टाग्राम चॅट झालं लिक

  • Share this:

नवी दिल्ली, 04 मे : सोशल मीडियावर अनेक व्हायरल न्यूज येतच असतात. हल्लीची तरुणाई संपूर्ण वेळ सोशल मीडियावरच घालवते. अनेक माध्यमांचा चुकीचा वापर झाल्यामुळे गुन्हे घडल्याचंही आपण पाहिलं आहे. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सोशल मीडियावर सध्या एक इन्स्टाग्राम चॅट जोरदार व्हायरल होत आहे. या चॅटमध्ये काही शाळकरी मुलं बलात्काराचा प्लान करत असल्याचं समोर आलं आहे. ट्विटरवर या इंस्टाग्राम ग्रुपविषयी बरीच चर्चा सुरू आहे. तर नेटकरी यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत आहे.

खरंतर, या इन्स्टाग्राम ग्रुपमध्ये 'बॉईज लॉकर रूम' नावाचा ग्रुप होता. यात सगळी शाळकरी मुलं होती. हे चॅट एका ट्विटर वापरकर्त्याने शेअर केलं आहे, जे वाचून सगळ्यांनाच धक्का बसला. यात एक मुलगा मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यासाठी इतरांना भडकवत असल्याचं समोर आलं.

कर्नाटकात मद्यप्रेमींनी केला रेकॉर्ड ब्रेक, 9 तासात झाली 45 कोटींची दारु विक्री

ग्रुप चॅटचे काही स्क्रीनशॉट सोशल मीडियावर लीक झाले आहेत. त्यावर मुलींनी पोस्ट देखील लिहिल्या आहेत. काही इन्स्टाग्राम वापरकर्त्यांनी स्क्रीनशॉट्स अपलोडही केले आहेत. यामध्ये काही मुलं एका मुलीवर बलात्कार करण्यासाठी प्लानिंग करत होते.

पुणे पोलिसांनी दारू विक्रीसाठी घेतला मोठा निर्णय, उद्यापासून नियम लागू

लोकांनी सोशल मीडियावर या ग्रुपविरूद्ध लिखाण सुरू केलं आणि ट्विटरवर #boislockerroom ट्रेंड करत आहे. ते थांबवून कडक कारवाई करण्याची मागणी लोक करीत आहेत. असं सांगितलं जात आहे की, या ग्रुपमधली बहुतेक मुलं दक्षिण दिल्लीची आहेत. दिल्ली पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करण्याचे आवाहन केले आहे. याप्रकरणी अद्याप पोलिसांनी कोणावरही गुन्हा दाखल केला नसून तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

Fact Check: सरकार बेरोजगारांना प्रत्येक महिन्यात देणार 3500 रुपये? खरं की खोटं

First published: May 4, 2020, 11:52 PM IST
Tags:

ताज्या बातम्या