पत्नीचा फोन सतत असायचा बिझी, पतीनं हत्या करून मृतदेहाचे केले तुकडे-तुकडे

पत्नीचा फोन सतत असायचा बिझी, पतीनं हत्या करून मृतदेहाचे केले तुकडे-तुकडे

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीनं तिची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली,23 सप्टेंबर : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीनं तिची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. आशु असं आरोपीचं नाव आहे. विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय घेत आशु आपल्या पत्नीला दररोज मारहाण करायचा. पण आशुच्या या संशयी वृत्तीनं टोक तेव्हा गाठलं जेव्हा त्यानं मारहाण करत पत्नीची हत्या केली. इतकंच नाही तर यानंतर त्यानं पतीच्या मृतदेहाचे तुकडे- तुकडे करून सेप्टिक टँकमध्ये फेकले. अंगावर काटा आणणारी ही घटना राजधानी नवी दिल्ली घडली आहे.

यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आशुनं पोलिसांकडे जाऊन केलेल्या गुन्ह्याची कबुलीदेखील दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आपल्या आईच्या घरी पत्नी सीमाची हत्या केली आणि तिच्या मृतदेहाचे तुकडे सेप्टिक टँकमध्ये फेकले...असं आरोपीनं सांगितलं. याप्रकरणी पोलीस आरोपीची कसून चौकशी करत आहेत.

(वाचा : धक्कादायक... 7 वर्षांच्या चिमुरडीवर 3 नराधम 8 महिन्यांपासून करत होते गॅंगरेप)

मिळालेल्या माहितीनुसार, 10 वर्षांपूर्वी सीमा आणि आशुचं लग्न झालं होतं. आशुनं शनिवारी (21 सप्टेंबर) रात्री 11 वाजता सीमाच्या आईला फोन करून तिची हत्या केल्याचं सांगितलं, अशी माहिती सीमाचा भाऊ संतोषनं पोलिसांना दिली. यानंतर त्यानं मोबाइल बंद करून ठेवला. सुरूवातीला वाटलं आशु थट्टा करतोय. पण आशुनं खरंच सीमाची हत्या केल्याचं समजल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी सासरी धाव घेतली.

(वाचा :हायप्रोफाईल डबल मर्डर! मित्राच्या गर्लफ्रेंडवर रेप करण्याचा प्लान फसला म्हणून...)

आशुनं सीमाचा मोबाइल तपासण्याचा केला प्रयत्न

पोलीस चौकशीदरम्यान आरोपी आशुनं आपल्या पत्नीवर संशय व्यक्त करण्याची कित्येक कारणं सांगितली. सीमाला फोन केल्यानंतर तिचा मोबाइल क्रमांक नेहमीच व्यस्त यायचा, असं आशुनं पोलिसांना सांगितलं. शिवाय, बहुताशं वेळ ती व्हॉट्सअॅपवर चॅटिंग करत राहायची. आपल्यामागे सीमा सतत कोणाशी तरी बोलतेय, असा आशुला संशय होता. अनेकदा त्यानं तिचा फोन तपासण्याचाही प्रयत्न केला. यातही तिचा फोन लॉक असल्यानं त्याचा संशय अधिकच वाढला. फोन तपासण्यावरून दोघांमध्ये सतत वाद देखील व्हायचे. चारित्र्यावर संशय घेत आशु सीमा सतत टोमणे देखील मारायचा. अखेर त्यानं संशयातून सीमाची निर्घृण हत्या केली.

(वाचा :मुलीशी अश्लील चाळे करत होता 'मास्तर', आईच्याच आले निदर्शनास)

VIDEO : नॅशनल हायवेवर तरुण करत होता असे भयंकर स्टंट; आता पोलीस घेतायत शोध

First published: September 23, 2019, 9:32 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading