नवी दिल्ली, 30 मार्च : देशाची राजधानी दिल्लीत एक भीषण अपघात (horrific accident) झाला आहे. एका पादचाऱ्याला धडक देत एसयूव्हीने चिरडलं (SUV hits man). या अपघातानंतर एसयूव्ही चालकाने न थांबता पळ काढला आहे. अपघाताची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून त्यााच व्हिडीओ आता सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे. (Live Accident caught in CCTV)
दिल्लीतील जनपथ येथून हिट अँड रन चा भयंकर व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओत दिसत आहे की, एका व्यक्तीला एसयूव्ही कार जोरदार धडक देते. त्यानंतर खाली कोसळलेल्या या इसमाच्या अंगावरुन एसयूव्ही निघून जाते. ही घटना सेंट्रल दिल्लीत घडली असून त्या ठिकाणच्या सीसीटीव्हीत हा अपघात कैद झाला आहे.
भरधाव SUVची पादचाऱ्याला जोरदार धडक#Delhi #Accident #CCTV pic.twitter.com/95kJORm7kz
— News18Lokmat (@News18lokmat) March 30, 2022
ही घटना बुधवारी सकाळच्या सुमारास घडली आहे. 39 वर्षीय व्यक्तीला भरधाव एसयूव्हीने जोरदार धडक दिली. या अपघातात पीडित व्यक्ती गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र, त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं. मृतक व्यक्तीचं नाव गिरधारी असल्याची माहिती समोर आली आहे.
वाचा : 'मला गरीबांच्या पैशातून महामार्ग बांधायचेत', नितीन गडकरींनी सांगितला मोठा प्लॅन
या घटनेनंतर एसयूव्ही चालकाने त्या पीडित व्यक्तीला मदत करण्याऐवजी तेथून पळ काढला. हा कार चालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहेत. संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून आरोपीचा शोध लवकरच लागेल असं बोललं जात आहे.
टिटवाळ्यात दीड वर्षांच्या मुलाला टॅम्पोने चिरडलं
टिटवाळा परिसरात दीड वर्षांच्या मुलीचा एका भयंकर अपघातात मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत मुलीच्या अंगवरुन टॅम्पो गेल्याने तिचा दुर्देवी मृत्यू झाला. या अपघाताचं एक सीसीटीव्ही फुटेजदेखील समोर आलं आहे. हा व्हिडीओ मन सुन्न करणारा आहे.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये तुम्ही पाहू शकता की, 24 मार्चच्या सकाळी सात वाजता दीड वर्षांचा मुलगा आपल्या दोन भाऊ-बहिणींसोबत घराच्या समोर बसून खेळत होता. त्यावेळी तेथे एक टॅम्पोदेखील उभा होता. त्यावेळी टॅम्पो चालक आला आणि दीड वर्षांच्या मुलाल चिरडून पुढे निघून गेला. या प्रकरणात टिटवाळा पोलिसांनी टॅम्पो चालक सैफ फारूखी याला अटक केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Accident, Cctv footage, Delhi