त्याच्या पत्नीनेही घेतला अखेरचा श्वास, जावयानं सासराच्या संपूर्ण कुटुंबावर मासळीतून केलं होतं स्लो पॉयझनिंग

त्याच्या पत्नीनेही घेतला अखेरचा श्वास, जावयानं सासराच्या संपूर्ण कुटुंबावर मासळीतून केलं होतं स्लो पॉयझनिंग

दिल्लीतील एका हायप्रोफाइल क्राइम केसमध्ये (High Profile Crime Case in New Delhi) महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. पत्नीच्या संपूर्ण कुटुंबावर एका स्लो पॉयझनिंगचा (Slow Poisoning) प्रयोग केल्याच्या घटनेत आता आरोपीच्या पत्नीचाही मृत्यू झाला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 09 एप्रिल: दिल्लीतील एका हायप्रोफाइल क्राइम केसमध्ये (High Profile Crime Case in New Delhi) महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. दिल्लीतील इंद्रपुरी पोलीस ठाणे हद्दीत एक भयंकर गुन्ह्याची घटना घडली होती. पत्नीच्या संपूर्ण कुटुंबावर एका व्यावसायिकाने स्लो पॉयझनिंगचा (Slow Poisoning) प्रयोग केला होता. थॅलियम नावाचे विष तो पत्नीच्या कुटुंबाला देत होता. यामध्ये आता त्याची पत्नी दिव्या अरोरा हिचा देखील मृत्यू (Divya Aroro Death) झाला आहे. गुरुवारी रात्री त्यांनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. या घटनेमध्ये आधी दिव्याची आई आणि बहिण दोघांता मृत्यू झाला होता तर दिव्या रुग्णालयामध्ये मृत्यूशी झुंज देत होती. पण आता तिचा देखील मृत्यू झाला आहे. या प्रकरणामध्ये बिझनेसमन असणाऱ्या आरोपी वरुण अरोराला (Varun Arora) अटक करण्यात आली होती.

आरोपीची सासू आणि मेव्हणीचा आधीच मृत्यू झाला होता. पत्नी आणि सासऱ्याची अवस्था होती, मात्र आता पत्नीचाही मृत्यू झाला आहे. दिल्लीमध्ये अशाप्रकारे सगळ्या कुटुंबाला थॅलियम देऊन मारण्याचा प्रयत्न असलेला पहिलाच प्रकार समोर आला आहे. (slow poisoning thallium case)

नेमकं काय घडलं होतं?

पोलिसांचं म्हणणं आहे, की थॅलियम हे एक असं स्लो पॉइझन आहे, की जे माणसाला हळूहळू मारतं. यामुळं माणसाचे केस गळू लागतात. शरीरात विविध त्रास निर्माण होऊ लागतात. शेवटी माणसाचा मृत्यू होतो. ही घटना पश्चिम दिल्लीच्या इंद्रपुरी ठाण्याच्या भागातील आहे. वरुण अरोराच्या ग्रेटर कैलास पार्ट - 1 इथल्या घरात एका ग्लासात थोडं थॅलियम मिळालं आहे. शिवाय त्याच्या मोबाइलमधून पोलिसांना या रसायनाबाबत काही माहिती मिळाली होती. या प्रकरणाच्या तपासात असे समोर आले होते की, सासरवाडीत याचा काही कारणांवरून अपमान झाला होता. याचा सूड उगवण्यासाठी यावर्षी जानेवारीत त्यानं आपल्या सासरवाडीत पत्नीसह सगळ्यांना मासळीच्या माध्यमातून थॅलियम हे विष दिलं.

(हे वाचा-रुद्रवार दाम्पत्यामध्ये नेमकं काय घडलं? US मीडियामधील बातम्यांमुळे गूढ वाढलं)

यानंतर हळूहळू कुटुंबातील लोकांचे केस गळू लागले. 22 मार्चला गंगाराम हॉस्पिटलमधून इंद्रपुरी पोलीस स्टेशनला याबाबत फोन गेला होता. सांगितलं गेलं होतं, की इंद्रपुरी भागात राहणाऱ्या अनिता देवी नावाच्या एका महिलेला हॉस्पिटलमध्ये आणलं गेलं होतं. डॉक्टरांनी पोलिसांना आपल्या निरीक्षणांमध्ये सांगितलं, की महिलेच्या रक्त आणि लघवीची तपासणी केल्यावर यात थॅलियम नावाचं विष मिळालं. यामुळं मृत्यूही होऊ शकतो. हे प्रकरण असं रहस्यमय झाल्यावर पोलिसांनी तपास आपल्याकडे घेतला. इंद्रपुरीचे एसएचओ सुरेंद्र सिंह, नारायणा ठाण्याचे इन्स्पेक्टर प्रमोद आणि मायापुरी सब डिव्हिजनचे एसीपी विजय सिंह यांच्या नेतृत्वात तपास पुढे जाऊ लागला. यादरम्यान पोलिसांना कळालं, की जीके पार्ट - 1 मध्ये राहणाऱ्या एका महिलेला सर गंगाराम हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये भरती केलं गेलं आहे.

फाइल फोटो- डावीकडे अनिता देवी (आरोपीची सासू), मध्यभागी आरोपीची पत्नी दिव्या, उजवीकडे आरोपीची मेव्हणी प्रियांका

फाइल फोटो- डावीकडे अनिता देवी (आरोपीची सासू), मध्यभागी आरोपीची पत्नी दिव्या, उजवीकडे आरोपीची मेव्हणी प्रियांका

तिचीही हिस्ट्री थॅलियम याच विषाची येते आहे. ती व्हेंटिलेटरवर आहे. दिव्या ही आरोपी वरुणची पत्नी आहे. चौकशीत पोलिसांना कळालं, की मृत अनिताच्या लहान मुलीचाही बीएल कपूर हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तिच्यातही थॅलियम पॉइझनची लक्षणं होती. तपासात देवेंद्र मोहन शर्मा यांच्यातही अशीच लक्षणं असल्याचं समोर आलं. प्रकरण खूप गंभीर होत असल्याचं पाहून पोलीस याच्या मुळापर्यंत गेले. कळालं, की अनिताकडे काम करणारी मोलकरीणही अशाच लक्षणांशी झुंजते आहे. तिचे उपचार सध्या आरएमएलमध्ये सुरू आहेत. आता पोलिसांना समजलं, की हे प्रकरण सगळ्या कुटुंबाला विष देऊन मारण्याचं आहे.

(हे वाचा-महाराष्ट्रातील तरुण दाम्पत्याचा अमेरिकेत संशयास्पद मृत्यू, घातपाताचा संशय)

या प्रकरणामध्ये मृतदेहाचं शवविच्छेदन आरएमएल हॉस्पिटलच्या शवागारात केलं गेलं. सीनियर डॉक्टर्सनी सविस्तर अटॉप्सी रिपोर्ट दिला. तपासादरम्यान जावई वरुणवरचा संशय बळावला. यानंतर तपासात असं समोर आलं की, त्यानं जानेवारीमध्ये सासरवाडीत आल्यावर सगळ्यांना मासळी खाऊ घातली होती. मासळी आणि अन्य गोष्टींमध्ये त्यानं थॅलियम मिसळून कुटुंबाला खाऊ घातलं होतं. यानंतर कुटुंबाची अवस्था खालावत गेली. वरुणला पकडून पोलिसांनी कडक शब्दात चौकशी केली. त्यानं सगळं सत्य कथन केलं. त्यानं सांगितलं, की सासरवाडीत झालेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी त्यानं हे केलं.

Published by: Janhavi Bhatkar
First published: April 9, 2021, 1:34 PM IST

ताज्या बातम्या