Home /News /crime /

प्रेमानंच घोटला गळा! पतीची हत्या करून फेसबुकवर ठेवलं स्टेटस, पत्नीचा आत्महत्येचा प्रयत्न

प्रेमानंच घोटला गळा! पतीची हत्या करून फेसबुकवर ठेवलं स्टेटस, पत्नीचा आत्महत्येचा प्रयत्न

चिराग शर्मा आणि पत्नी रेणुका दोघंही बेशुद्ध अवस्थेत असल्याचं पोलिसांना दिसलं. पोलिसांनी तातडीनं दोघांनाही रुग्णालयात दाखल केलं मात्र तोपर्यंत थोडा उशीर झाला होता.

    नवी दिल्ली, 04 जानेवारी : पत्नीनं आपल्या पतीची हत्ये केल्याच्या घटनेनं खळबळ उडाली आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे हत्येनंतर फेसबुकवर हत्येची कबुली देत पत्नीनं टोकाचं पाऊल उचललं आहे. या दोघांचं एकमेकांवर जीवापाड प्रेम होतं मग दोघांमध्ये नेमकं काय झालं आणि कशावरून वाद टोकाला पोहोचला याबाबत अद्याप कळू शकलं नाही मात्र या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार रेणुका आणि चिराग यांचा 8 वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात खटके उडत होते. रोज त्यांच्यात छोट्या गोष्टींवरून देखील वाद होत असतं. रेणुकानं टोकाचं पाऊल उचलत पती चिरागची संतापाच्या भरात चाकूनं सपासप वार करत हत्या केली आहे. त्यानंतर तिनं आपल्या गुन्ह्याची कबुली थेट फेसबुकवर स्टेटस ठेवून केली. फेसबुकवर स्टेटस अपलोड केल्यानंतर रेणुकानंही टोकाचं पाऊल उचलत आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. या घटनेची माहिती घरमालक आणि शेजारच्यांना कळताच त्यांनी पोलिसांना दिली. सगळे तातडीनं रेणुका-चिराग राहात असलेल्या ठिकाणी पोहोचले. दरवाजा आतून बंद असल्यानं तो तोडावा लागला. चिराग शर्मा आणि पत्नी रेणुका दोघंही बेशुद्ध अवस्थेत असल्याचं पोलिसांना दिसलं. पोलिसांनी तातडीनं दोघांनाही रुग्णालयात दाखल केलं मात्र तोपर्यंत थोडा उशीर झाला होता. चिरागचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी पोलिसांना दिली आणि तर सुदैवानं रेणुकाचा जीव वाचवण्यात डॉक्टरांना यश आलं आहे. सध्या तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे वाचा-भीषण! प्रायव्हेट पार्टवर खोल जखमा; विद्यापीठामागे आढळला तरुणीचा शिर नसलेला शव या दोघांमध्ये वादाचं कारण काय होतं? रेणुकानं धक्कादायक पाऊल का उचललं या प्रकरणी तिची आणि शर्मा कुटुंबियांची पोलिसांकडून चौकशी केली जाणार आहे. ही धक्कादायक घटना दिल्लीतील छतरपूर एक्स्टेन्शन परिसरात घडल्याची माहिती मिळाली आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Delhi

    पुढील बातम्या