Home /News /crime /

'पुष्पा', 'भौकाल' बघून बनवली 'बदनाम गँग', फिल्मी स्टाइलमध्ये अल्पवयीन तरुणांनी केलं हत्याकांड!

'पुष्पा', 'भौकाल' बघून बनवली 'बदनाम गँग', फिल्मी स्टाइलमध्ये अल्पवयीन तरुणांनी केलं हत्याकांड!

दिल्लीतल्या (Delhi Crime) तीन अल्पवयीन मुलांनी सध्या गाजत असलेला पुष्पा (Pushpa) हा सिनेमा आणि भौकाल (Bhaukaal) या वेबसीरिजपासून प्रेरणा घेऊन गॅंग तयार करून एका निरपराध व्यक्तीची हत्या (Murder) केली.

नवी दिल्ली, 21 जानेवारी: गुन्हेगारी केंद्रीत (Crime) कथानक असलेले चित्रपट, वेबसीरिज किंवा सीरियल्सपासून प्रेरणा घेऊन गुन्हा करण्याची प्रकरणं अलीकडे वाढताना दिसत आहेत. दिल्लीतल्या (Delhi Crime) तीन अल्पवयीन मुलांनी सध्या गाजत असलेला पुष्पा (Pushpa) हा सिनेमा आणि भौकाल (Bhaukaal) या वेबसीरिजपासून प्रेरणा घेऊन गॅंग तयार करून एका निरपराध व्यक्तीची हत्या (Murder) केली. दहशत निर्माण करण्याच्या हेतूने त्यांनी या पूर्ण घटनेचा व्हिडीओ शूट केला. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर अपलोड करण्यापूर्वीच या तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली. या घटनेबाबत बोलताना उत्तर-पश्चिम जिल्हा पोलीस उपायुक्त उषा रंगनानी यांनी सांगितलं, '19 जानेवारीला पोलिसांनी जहांगीरपुरी येथून एका जखमी युवकाला बाबू जगजीवनराम रुग्णालयात दाखल केलं; मात्र रुग्णालयातल्या डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. अज्ञात व्यक्तींनी या तरुणाच्या पोटात चाकू खुपसला होता. मृत व्यक्तीचं नाव शिबू (वय 24) असून, तो जहांगीरपुरीचा रहिवासी होता. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. परिसरातलं सीसीटीव्ही फुटेज तपासलं असता, तीन मुलं शिबूशी भांडण करत असल्याचं दिसलं. पोलिसांनी फुटेजमधून आरोपींचे फोटो काढून तपास सुरू केला. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने 24 तासांच्या आत या आरोपींना अटक केली; मात्र हे तिघेही अल्पवयीन असल्याचं तपासातून स्पष्ट झालं.' हे वाचा-रिअल लाईफमधील ‘थप्पड’, वधूचा Dance पाहून वराने दिली कानशिलात आणि घडलं महानाट्य पकडण्यात आलेल्या अल्पवयीन मुलांनी सांगितलं की, 'पुष्पा आणि भौकाल आदींमध्ये दाखवलेल्या गॅंगस्टर्सच्या साहसी आणि ग्लॅमरस जीवनशैलीनं आम्ही प्रभावित झालो आणि आम्हाला त्याचं अनुकरण करायचं होतं.' या आरोपींपैकी एक जण पुष्पा चित्रपटातल्या एका पात्राची हुबेहुब नक्कल करतो. 'या अनुकरणाचा एक भाग म्हणून आम्ही एक बदनाम गॅंग तयार करण्याचा निर्णय घेतला. आमची गॅंग सोशल मीडियावर (Social Media) प्रसिद्ध होण्यासाठी, तसंच मित्र प्रभावित व्हावेत यासाठी इन्स्टाग्रामवर (Instagram) व्हिडीओ अपलोड करण्याच्या उद्देशानं एखाद्या व्यक्तीचा खून करण्याचा आम्ही निर्णय घेतला. यासाठी 19 जानेवारीला आम्ही जहांगीरपुरीत पोहोचलो. त्या वेळी आम्हाला शिबू येताना दिसला. आमच्यातल्या एकानं त्याच्यावर काठीने हल्ला केला. दुसऱ्यानं त्याला मागच्या बाजूनं पकडलं आणि तिसऱ्यानं त्याच्या पोटात सुरा खुपसला.' हे वाचा-हातात सिगारेट, तोंडात शिव्या; 19 वर्षीय लेडी डॉन अखेर पोलिसांच्या अटकेत या घटनेनंतर हे तीनही अल्पवयीन फरार झाले. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ अपलोड करण्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना अटक केली. तसंच पोलिसांनी त्यांच्याकडून सुरा आणि मोबाइल जप्त केला आहे. या घटनेचा अधिक तपास सुरू असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं.
First published:

Tags: Crime

पुढील बातम्या