Home /News /crime /

संरक्षण घोटाळा : अमेरिकन कंपनी AKON आणि भारतीय वैज्ञानिकाविरोधात CBI कडून गुन्हा दाखल

संरक्षण घोटाळा : अमेरिकन कंपनी AKON आणि भारतीय वैज्ञानिकाविरोधात CBI कडून गुन्हा दाखल

या प्रकरणात मोठा घोटाळा झाल्याची बाब समोर आली आहे

    नवी दिल्ली, 4 जानेवारी : सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनने (CBI) तत्कालीन वैज्ञानिक आणि अमेरिकन कंपनी एकॉन (AKON) यांच्यासह अज्ञात लोकसेवकाविरूद्ध संरक्षण घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एजन्सीने भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 120 बी आणि 400 अन्वये लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. 2007 मध्ये डीआरडीओसाठी 35 रेडिओ फ्रिक्वेन्सी जनरेटरच्या खरेदीत कथित अनियमिततेमुळे सीबीआयने ही कारवाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ज्या वैज्ञानिकाविरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे, त्यांचं नाव प्रिया सुरेश आहे. प्रिया सुरेश डीआरडीओच्या डिफेन्स एव्हिओनिक्स रिसर्च आस्थापनात वैज्ञानिक होत्या. त्याच्यावर फसवणूकीचा आरोप आहे. हे जनरेटर 10 लाख 80 हजार 450 डॉलर्समध्ये खरेदी करण्यात आले होते. 2009 मध्ये जनरेटरच्या 35 युनिट तीन कन्साउन्मेंटच्या माध्यमातून डीआरडीओला पाठवण्यात आले होते. एकॉन कंपनीला याबद्दल 90 टक्के मिळाले होते. हे ही वाचा-‘Hello, तुमची पत्नी आणि मुलीचा अश्लील Video माझ्याजवळ आहे’; वाचा काय आहे प्रकार या 35 युनिट्सपैकी 23 डिलिव्हरीच्या काही आठवड्यात दुरुस्ती आणि अपग्रेडच्या नावाखाली पुन्हा अमेरिकेत पाठविण्यात आलं होतं. यानंतर आतापर्यंत कंपनीने चांगल्या पद्धतीने काम करण्यारे युनिट्स उपलब्ध करुन देऊ शकली नाही. प्रिया सुरेशने या जेनरेट्स पुन्हा पाठविण्याची शिफारस केली होती, मात्र याची कोणत्याही प्रकारे नोंद नाही. यासोबतच त्यांनी युनिर्ट अपूर्ण असताना आणि पुन्हा पाठविल्यानंतरही त्यांनी कंपनीला उर्वरीत रक्कम कंपनीला दिली होती. हे ही वाचा-नववर्षानिमित्त रशियाचे राष्ट्राध्यक्ष करीत होते भाषण; TV वर चेहराचं दिसेना महत्त्वाचं म्हणजे या करारात ऑर्डर केलेल्या 35 फ्रीक्वेंसी जनरेटर्समध्ये डीआरडीओजवळ सद्यस्थितीत केवळ 12 यूनिट्स असून हेदेखील काम करण्याच्या स्थितीत नाही. सीबीआयचं म्हणणं आहे की, प्राथमिक तपासानंतर प्रिया सुरेश आणि अमेरिकन कंपनी कथिक फसवणुकीत सामील होते. कंपनी आणि प्रिया सुरेश यांना फसवणूक आणि गुन्हेगारीचा कट, भ्रष्टाचाराचा आरोप लावण्यात आला आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: CBI

    पुढील बातम्या