धुळे, 17 मार्च : धुळ्यात (Dhule) मुंबई-आग्रा महामार्गावर (Mumbai-Agra Highway) एका महिला आणि पुरुषाने दारू पिऊन धिंगाणा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, चौकशीसाठी आलेल्या पोलिसाचीच (Police) कॉलर पकडून महिलेने त्यांना धक्काबुक्की केली. संबंधित महिला आणि पुरुष दीर-भावजय असल्याची माहिती समोर आली आहे. मद्यधुंद दीर-भावजयीचा धिंगाण्याचा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 40 वर्षीय महिला आणि तिच्यासोबत असलेली व्यक्ती रस्त्यावर गोंधळ घालत होते. त्यावेळी घटनास्थळी समजवण्यासाठी आलेल्या पोलिसांनाच महिलेने शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. धुळे जिल्ह्यातील मुंबई आग्रा महामार्गावरील नरडाणा जुन्या टोलनाक्याजवळ हा प्रकार घडला. यावेळी महिलेसह असलेल्या व्यक्तीने सुमारे तासभर मद्यधुंद अवस्थेत रस्त्यावरच धिंगाणा घालून पोलिसांशी हुज्जत घातली. या प्रकरणी महिलेसह दोघांविरुद्ध नरडाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
फुलराणी झाली 31 वर्षांची! ...म्हणून आजीने महिनाभर पाहिलं नव्हतं सायनाचं तोंड
भररस्त्यात दारू पिऊन संबंधित महिलेने धिंगाणा घालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यावेळी नरडाणा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शरद पाटील हे गस्तीवर होते. जुन्या टोल नाक्याजवळ रस्त्याच्या कडेला महिलेस एक पुरुष असे दोघे आक्षेपार्ह अवस्थेत बसलेले होते. दोघेही मद्य सेवन करीत असल्याचे पोलिसांना निदर्शनास आले. यामुळे पोलिसांनी दोघांना तेथून निघून जाण्यास सांगितले, याचा राग आल्यामुळे मद्यधुंद अवस्थेतील महिलेसह दोघांनी उपनिरीक्षक पाटील यांना शिवीगाळ, दमदाटी केली. तसंच त्यांच्या शर्टाची कॉलर धरून त्यांना धक्काबुक्की केली. यानंतर महिला पोलिसाला बोलविण्यात आले. त्या महिला पोलिसालाही मद्यपी महिलेने अश्लील शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली. उपनिरीक्षक शरद पाटील यांनी त्यांना हटकले असता त्यांनी उपनिरीक्षक पाटील यांच्याशी हुज्जत घालत त्यांची कॉलर पकडली.
Explainer : लष्करी हुकूमशाहीला कसं घाबरवतंय महिलांचं पारंपरिक वस्त्र?
अखेर महिला पोलिसाने मद्यपी, महिलेला पोलीस वाहनात बसविले. यानंतर दोघांना नरडाणा पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्यांची विचारपूस करता, त्यांनी अलका किशोर पाटील (वय 40, रा.डोंगरे महाराज नगर, पारोळारोड धुळे) आणि भूषण ज्ञानेश्वर पाटील (वय 31, रा.शिंदखेडा) असे नाव सांगितले. या दोघांविरुद्ध नरडाणा पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या दोघांना ताब्यात घेऊन त्यांची वैद्यकीय तपासणी केली. महिलेसह दोघांनी मद्य प्राशन केले होते. यामुळे त्या महिलेसह दोघांविरुद्ध नरडाणा पोलीस ठाण्यात विविध कलमान्वय गुन्हा दाखल केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Covid19, Crime, Dhule, Maharashtra