मुंबई, 26 जानेवारी : मुंबईत (Mumbai) गेल्या काही महिन्यांपासून कार्ड क्लोनिंगचे (Card Cloning) प्रकार वाढले आहे. सध्या मुंबईत ओटीपी, कार्डची माहिती तसंच बॅंक खात्यांची माहिती चोरुन फसवणुकीचे प्रकार वाढले आहे. आता नव नवीन पद्धत वापरुन कार्ड क्लोनिंग करून कार्डधारकांची फसवणूक होत असल्याचे प्रकरण समोर आले आहे.
माहिम येथील जिमी हंसोटिया आणि मेहुल पटेल या दोन मुंबईकरांचे कार्ड क्लोनिंग करुन जिमी हंसोटिया यांना 50 हजार तर मेहूल पटेल यांना कार्ड क्लोलिंग करून चोरांनी 95 हजार रुपये लंपास केले आहे. तर मुंबईतील गावदेवी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका महिला वकिलाच्या खात्यातून 65 हजार रुपये, अंधेरी येथील एका व्यावसायिकाच्या खात्यातून 20 हजार रुपये, बोरीवली येथील जय मेहता यांच्या खात्यातून 40 हजार रुपये, आणि ताडगेव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका 65 वर्षीय वृद्धाच्या खात्यातून 58 हजार रुपये चोरले गेले आहेत. या सर्वांनी एटीएमचा वापर केला होता. मात्र, त्यावेळेस यांनी कोणतीही खबरदारी घेतली नव्हती. खरंतर प्रत्येक वेळेस एटीएममधून पैसे वाढताना योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे अन्यथा तुमची फसवणूक झालीच म्हणून समजा.
कार्ड क्लोनिंग कसे केले जाते ?
- एटीएम सेंटरमधून कार्ड क्लोनिंग केले जाते. एटीएम सेंटरमध्ये छुपे कॅमेरे लावून तुमच्या कार्डची माहिती कॅमेऱ्यात कैद केली जाते. तुम्ही जेव्हा एटीएम मध्ये कार्ड टाकता तेव्हा तुम्ही एटीएम पिन टाईप करता तो पिन दिसेल असा कॅमेरा लावला जातो. मग एक तर तो मागे किंवा वर भिंतीवर लावला जातो किंवा एटीएमवर लावलेल्या डाईलपॅडवरील मोकळ्या जागेत छुपा चीप कॅमेरा लावला जातो.
तसंच ज्या ठिकाणी आपण एटीएम इन्सर्ट करता त्यावर स्किमर लावून तुमच्या कार्डची सर्व माहिती सेव्ह होते. मग कॅमेरा-यात रेकाॅर्ड झालेला तुमचा एटीएम पीन आणि स्किमर मधील डेटा कार्ड मध्ये सेव्ह झालेली तुमच्या कार्डची सर्व माहिती चोरुन चोर बनावट एटीएम कार्ड तयार करुन तुमच्या खात्यातून पैसे काढतात.
कार्ड क्लोनिंगपासून वाचण्याकरिता काय करावे?
- एटीएम सेंटरमध्ये गेल्यावर सुरक्षा रक्षक आहे का ते तपासा
- एटीएम मशीनवर कुठे कमेरे लावलेत पाहा, एटीएम पिन टाइप करतो त्या दिशेने कॅमेरा असल्यास एटीएम पीन एंटर करू नका.
- डायल पॅडच्या दिशेने असलेला कॅमेरा सुरक्षा रक्षकाला निदर्शनास आणून द्या
- एटीएम कार्ड आपण ज्या ठिकाणी इन्सर्ट करतो ते तपासून पहावे, त्यावर साॅकेट ( स्कीमर ) लावण्यात आलंय का ते तपासावे
- पैसे काढल्यानंतर एटीएम मशीनच्या स्क्रीनवरील पुर्ण व्यवहार बंद झाल्यावरचं एटीएममधून बाहेर पडावे
- आपल्या एटीएम कार्डचा पीन सतत बदलवा
- ऑनलाईन नेटबँकिंग करताना आपला एटीएम पिन अथवा सिक्युरिटी नंबर कधीही शेअर करू नये
- आपली एटीएम संदर्भाताली कोणतीही खाजगी माहिती कोणालाही देऊ नये
- एटीएम कार्ड कोठेही वापरताना कार्ड स्वतःच्या देखत मशीनवर स्वाॅईप करावे
- बँकेचा तक्रार निवारण कक्षाचा नंबर नेहमी जवळ ठेवावा, कोणताही धोका वाटल्यास ताबडतोब कार्ड ब्लाॅक करावे
- तुमच्या मोबाईल फोनमधील सिम कार्ड हे जर फार जुने असेल व ते जर कॉम्फ 1 या व्हर्जनचे असेल तर ते तात्काळ बदलून कॉम्फ 3 चे बदलून घ्या
- तुम्ही कुठल्याही कारणासाठी तुमचे वैयक्तिक कागदपत्रे कोणाला देत असाल तर त्यावर कागदपत्रांवर नमूद कारण लिहा
- मोबाईल फोन अचानक नो सिम कार्ड दाखवत असेल किंवा नो नेटवर्क बऱ्याच वेळ दाखवत असेल तर त्वरित तुमचे बँक खाते हे काही वेळा साठी गोठवा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.