नागपूर, 11 जानेवारी : नागपूरमध्ये (Nagpur) एका लॉजवर पॉर्न व्हिडीओ (Porn Video) बघून वेगवेगळ्या प्रकारच्या पोझिशनमध्ये (sex positive) शारारिक संबंध ठेवत असताना गळफास लागून तरुणाचा मृ्त्यू झाला होता. आता या प्रकरणी त्याच्या प्रेयसीला अटक करण्यात आली आहे.
नागपूर जिल्ह्याच्या सावनेर तालुक्यातील खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका लॉजवर 8 जानेवारी रोजी ही घटना घडली होती. पण त्यानंतर मृत तरुणाच्या कुटुंबीयांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल केला असून तरुणीला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यानंतर आता अटक करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतक तरुण हा 27 वर्षीय असून तो इंजिनिअर होता. हा तरुण विवाहित होता. दोन वर्षांपासून त्याचे 26 वर्षीय तरुणीसोबत प्रेमसंबंध जुळले होते. याबद्दल त्याच्या कुटुंबीयांना माहित होते. तो गुरुवारी दुपारी छोट्या मुलाला घेऊन डॉक्टरकडे जाणार असल्याचे कुटुंबीयांना सांगितले होते. त्यानंतर त्याला तरुणीचा फोन आला होता. त्यानंतर तो कामानिमित्ताने सावनेरला जात असल्याचे त्याने घरच्याना सांगितले होते. पण संध्याकाळ झाली तो परतला नाही. फोन केल्यावरही कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर रात्री 10 वाजता त्याचा अपघात झाल्याची माहिती मिळाली, असेह त्याच्या वडिलांनी तक्रारीत नमूद केले आहे.
काय घडलं नेमकं?
मृत तरुण आणि तरुणीने शुक्रवारी दोघांनीही बाहेर फिरायला जाण्याचा बेत आखला होते. दोघांनी खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दहेगाव परिसरात असलेल्या लॉजवरील एक खोली बुक केली होती.
तिथे गेल्यानंतर दोघांनी शाररिक संबंध प्रस्तावित केले. यावेळी वेगवेगळ्या पोझिशनमध्ये शाररिक संबंध प्रस्तावित करताना दोघांनी दोरीचा उपयोग केला. तरुण खुर्चीवर बसल्यानंतर त्याचे हात आणि पाय दोरीने बांधण्यात आले होते., त्याच वेळी ती दोरी त्याच्या गळ्याच्या भोवती सुद्धा आवळण्यात आली होती. या पोझिशनमध्ये सेक्स झाल्यानंतर तरुणी बाथरूममध्ये गेली. असता तो तरुण खुर्चीसह खाली कोसळला. ज्यामुळे त्याच्या गळ्याभोवती असलेला दोर आवळला गेला होता. त्यामुळे त्याला गळफास लागून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
त्याची प्रेयसी जेव्हा बाथरूमच्या बाहेर आली, तोपर्यंत त्या तरुणाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर लगेचच या घटनेची माहिती लॉज व्यवस्थापकांना देण्यात आली होती. त्यांनी पोलिसांना या संदर्भात माहिती दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.
पोलिसांनी तरुणाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आणि तपास सुरू केला. आता या प्रकरण मृतक तरुणाच्या कुटुंबीयांनी तक्रार दाखल केल्यामुळे प्रकरणाला नवीन वळण मिळाले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.