मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

जळगाव: दुकानात जात असल्याचं सांगून गेलेला तरुण परतलाच नाही; सत्य समजताच हादरली आई

जळगाव: दुकानात जात असल्याचं सांगून गेलेला तरुण परतलाच नाही; सत्य समजताच हादरली आई

मंगळवार 6 डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता महाबळ येथून आईसोबत येत असताना तो आईला दुकानात जातो, असं सांगून गेला. त्यानंतर भयानक घडलं

मंगळवार 6 डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता महाबळ येथून आईसोबत येत असताना तो आईला दुकानात जातो, असं सांगून गेला. त्यानंतर भयानक घडलं

मंगळवार 6 डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता महाबळ येथून आईसोबत येत असताना तो आईला दुकानात जातो, असं सांगून गेला. त्यानंतर भयानक घडलं

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Jalgaon, India
  • Published by:  Kiran Pharate

नितीन नांदुरकर, जळगाव 07 डिसेंबर : जळगावमधून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत शहरातील समता नगरात राहणाऱ्या तरुणाने महाबळ परिसरातील एका बांधकामाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली. याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कांतीलाल मोहन पवार असं मयत झालेल्या तरुणाचं नाव आहे.

व्यापारात नुकसान, तर पत्नीच्या नावावर पॉलिसी, वादातून पतीने उचललं भयानक पाऊल

कांतीलाल पवार हा आई, पत्नी आणि तीन वर्षाचा मुलगा यांच्यासह वास्तव्याला होता. हातमजुरीचं काम करून तो आपला उदरनिर्वाह करत होता. दरम्यान मंगळवार 6 डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता महाबळ येथून आईसोबत येत असताना तो आईला दुकानात जातो, असं सांगून गेला. त्यानंतर महाबळ परिसरातील त्र्यंबकनगरातील बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली.

या घटनेत या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. त्याला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता तपासणीनंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मयत घोषित केलं. मी दुकानात जातो, असं आईला सांगून गेलेला कांतीलाल परतलाच नाही. त्यामुळे या कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. समता नगरातील या तरूणाने तिसऱ्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली.

Jharkhand Murder Case : रक्ताच्या नात्याचा भयावह चेहरा, भावाचे शीर छाटले अन् मित्रांनी घेतला सेल्फी, पोलिसही झाले सुन्न

कांतीलालने नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. एकुलता एक भाऊ गेल्याने बहिणीने रूग्णालयातच प्रचंड आक्रोश केला. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांची मोठी गर्दी जमली होती. याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मात्र, आत्महत्येच्या या धक्कादायक घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

First published:

Tags: Jalgaon, Marathi news, Suicide