Home /News /crime /

Wardha Crime : तंबाखूचा वाद अन् मारहाणीत तरुणाचा झाला मृत्यू, वर्ध्यातील खळबळजनक घटना

Wardha Crime : तंबाखूचा वाद अन् मारहाणीत तरुणाचा झाला मृत्यू, वर्ध्यातील खळबळजनक घटना

अविनाश दिलीप नेहारे असे मारहाणीत मृत्यू झालेल्या अल्पवयीन मुलाचे नाव आहे. तंबाखू न दिल्याने हा वाद झाला होता.

    वर्धा, 2 जुलै : राज्यातील तरुणाई गुटखा, तंबाखू तसेच दारुच्या आहारी गेल्याचे दिसते. (Tobacco Addiction in Maharashtra) त्यातच आता तंबाखूच्या वादातून (Tobacco Dispute Wardha) झालेल्या हाणामारीत एका अल्पवयीन मुलाचा मृत्यू (Death in Tobacco Dispute Wardha) झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आरोपी पती-पत्नीला अटक करण्यात आली आहे. आरोपींना अटक - अविनाश दिलीप नेहारे असे मारहाणीत मृत्यू झालेल्या अल्पवयीन मुलाचे नाव आहे. ही घटना 29 जूनला धामणगाव वाठोडा येथे घडली. तंबाखू न दिल्याने हा वाद झाला होता. उमेश मनीराम उईके (वय 44), उषा उमेश उईके (वय 35, दोन्ही रा. धामणगाव वाठोडा) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर त्यांच्या 13 वर्षीय अल्पवयीन मुलालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नेमकं काय घडलं -  अविनाश हा बेबी नेहारे यांचा मुलगा होता. तो आरोपी उमेश उमेशच्या घराकडून जात होता. यावेळी त्याने उमेशकडे तंबाखू मागितली. तर यावर उमेशने तंबाखू देत नाही, असे म्हणत शिवीगाळ सुरू केली. अविनाशने त्याला शिवीगाळ का करतो, असे विचारले असता दोघांमध्ये वाद झाला. यावेळी लगेचच उमेशची पत्नी उषा घरातून बाहेर आली आणि दोन्ही आरोपींनी अविनाशला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. इतकेच नव्हे तर आरोपीच्या 13 वर्षांच्या मुलानेही कुऱ्हाडीच्या दांड्याने अविनाशच्या डोक्यावर घाव घातला. तर उमेशने चाकूने अविनाशच्या छातीवर वार केले. हेही वाचा - सर्वांना वेगवेगळ्या खोलीत थांबवलं, घरातील दिवे घालवले; मांत्रिकाने एक एक करीत वनमोरे कुटुंबातील 9 जणांना संपवलं यानंतर त्याला सावंगी येथील रुग्णालयात उपचार दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान आज शनिवारी त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच, सावंगी पोलिसांनी अविनाशच्या मृत्यूपूर्व जबाब नोंदवला. यानंतर पोलिसांनी दाम्पत्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच आरोपी पती पत्नीला अटक करण्यात आली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी पियूष जगताप यांच्या मार्गदर्शनात पोलीस पुढील तपास करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Death, Wardha news

    पुढील बातम्या