• Home
 • »
 • News
 • »
 • crime
 • »
 • Online क्लासदरम्यान शिकवता शिकवता टीचरने सोडला जीव; विद्यार्थ्यांना बसला धक्का

Online क्लासदरम्यान शिकवता शिकवता टीचरने सोडला जीव; विद्यार्थ्यांना बसला धक्का

यावेळी टीचरने विद्यार्थ्यांना पाहण्याची इच्छाही व्यक्त केली होती.

 • Share this:
  केरळ, 29 ऑक्टोबर : केरळमधील (Keral News) कासरगोड जिल्ह्यामधील एका खासगी शाळेतील (Private School Teacher) टीचरला आपल्या फोनवर ऑनलाइन क्लासमध्ये (Online Class) शिकवत असताना अस्वस्थ वाटू लागलं आणि त्या बेशुद्ध झाल्या. आणि धक्कादायक म्हणजे काही मिनिटांनंतर त्यांचं निधन झालं. (Death of a teacher while teaching during an online class) त्यांच्या कुटुंबीयांतील एका सदस्याने याबाबत माहिती देताना सांगितलं की, गुरुवारी रात्री गणित शिकवत असताना टीचरने काही वेळापूर्वी विद्यार्थ्याना पाहण्याची इच्छा व्यक्त केली होती. खासगी शाळेतील प्राथमिक विभागातील इयत्त तिसरीच्या वर्गाला गणित शिकविणाऱ्या टीचर माधवी सी यांच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. त्या गुरुवारी मुलांना शिकवत होत्या. मात्र अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनी क्लास मध्येच थांबवला. टीचरच्या मोबाइल फोनमधील ऑनलाइन क्लासची रेकॉर्डिंग आता त्यांचे नातेवाईक आणि विद्यार्थ्यांसाठी दु:खदायक ठरली आहे. शिकवत असताना अचानक माधवी यांना अस्वस्थ वाटू लागलं. आणि श्वास घ्यायला त्रास जाणवू लागला. काही वेळानंतर त्यांना खोकला येऊ लागला. हे ही वाचा-मुलीची छेड काढणाऱ्या live in पार्टनरला आईने पेट्रोल टाकून जिवंत जाळलं ऑनलाइन क्लासदरम्यान माधवी टीचर सांगत होत्या की, पुढील आठवड्यात शाळा पुन्हा सुरू होतील आणि त्यांना सर्व विद्यार्थ्यांना पाहायचं आहे. माधवी यांनी विद्यार्थ्यांना होमवर्क दिला आणि आणि क्लास संपवला. काही वेळानंतर घरीत आलेल्या एका नातेवाईकांनी माधवी यांना जमिनीवर पडलेलं पाहिलं. त्यांनी माधवींना तातडीने रुग्णालयात हलवलं. येथे डॉक्टरांनी माधवी यांना मृत घोषित केलं. कुटुंबीयांनी सांगितलं की माधवी यांच्या मृत्यूमागे उच्च रक्तदाब असू शकतं.
  Published by:Meenal Gangurde
  First published: