मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

दिवसभर बेसमेंट त्यानंतर रिक्षातून फिरत होता मृतदेह; आता हातावरील टॅटूने ओळख पटवणार, भयावह घटना

दिवसभर बेसमेंट त्यानंतर रिक्षातून फिरत होता मृतदेह; आता हातावरील टॅटूने ओळख पटवणार, भयावह घटना

ही व्यक्ती रिक्षातून मृतदेह फिरवत होती, जेव्हा पोलिसांनी पाहिलं तेव्हा हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

ही व्यक्ती रिक्षातून मृतदेह फिरवत होती, जेव्हा पोलिसांनी पाहिलं तेव्हा हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

ही व्यक्ती रिक्षातून मृतदेह फिरवत होती, जेव्हा पोलिसांनी पाहिलं तेव्हा हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

  • Published by:  Meenal Gangurde

नवी दिल्ली, 24 जुलै : देशाची राजधानी दिल्लीच्या महिपालपूर (Mahipalpur) येथून सकाळी 9 वाजेदरम्यान वसंत कुंज येथील पोलीस ठाण्यात फोन आला. हा कॉल पीसीआरमध्ये तैनात हेड कॉन्स्टेबल विनोद यांनी केला होता. हेड कॉन्स्टेबलने ड्यूटी अधिकाऱ्यास सांगितलं की, एका व्यक्तीने हत्या केल्यानंतर मृतदेह रिक्षाममध्ये घेऊन जात होता. (Accused Disposing Dead Body Secretly) त्याला पकडण्यात आलं आहे.

यानंतर घटनास्थळी पोलीस पोहोचले. त्यांनी पाहिलं की रिक्षात एक मृतदेह होता. मृतदेहावर निळ्या रंगाचा शर्ट, निळ्या रंगाला लोवर आणि नायकीचे शूज घातले आहे. याव्यतिरिक्त त्याची ओळख पटेल अशी एकही वस्तू त्याच्याजवळ नाही. ही व्यक्ती एका चांगल्या घरातील असल्याचं दिसत आहे. मृतदेहाच्या खिशामध्ये इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्टच्या पार्किंगची एक स्लिप सापडली आहे. पोलीस आता या मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी त्याच्या डाव्या हातावरुन टॅटूची मदत घेत आहे. मृतदेहाच्या हातावर हिंदीमध्ये महाकाल असं लिहिलं आहे.

नेमकं काय झालं होतं त्या दिवशी...

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांनी रिक्षात मृतदेह बाळगणार्‍या सुरेश नावाच्या आरोपीला अटक केली आहे. आरोपीने पोलिसांना सांगितले की तो एका इमारतीत वॉचमॅन म्हणून काम करतो. 22 आणि 23 जुलै रोजी मध्यरात्री जेव्हा तो तळघरात होता तेव्हा ती व्यक्ती दारूच्या नशेत तिथे आली आणि त्याने सुरेशशी गैरवर्तन करण्यास सुरुवात केली. त्यानंतर रागाच्या भरात सुरेशने त्याला मुक्का मारला, यामुळे तो खाली पडला. आरोपीने सांगितले की, मग भीतीपोटी त्याने त्या व्यक्तीचा गळा आवळून हत्या केली.

हे ही वाचा- कोविडच्या धास्तीनं तरुण जोडप्यानं संपवलं जीवन; मुंबईमधील मन हेलावून टाकणारी घटना

त्याने दिवसभर तळघराच्या खोलीत मृतदेह ठेवला आणि नंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तो रिक्षात घेऊन जात होता. यादरम्यान पोलिसांची नजर त्याच्यावर पडली. ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी तो मृतदेह सफदरजंग रुग्णालयात ठेवला आहे. आता महाकाल टॅटू आणि पार्किंग स्लिपच्या माध्यमातून मृताची ओळख पटविण्यासाठी पोलीस प्रयत्न करीत आहेत.

First published:

Tags: Crime, Delhi, Murder