मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /Shocking! शेजारच्या घरात सापडला 3 वर्षांच्या मुलीचा मृतदेह, 8 दिवसांपासून होती बेपत्ता

Shocking! शेजारच्या घरात सापडला 3 वर्षांच्या मुलीचा मृतदेह, 8 दिवसांपासून होती बेपत्ता

Excuse-Me वापरायला शिकवा

मुलांना एक्सक्यूज-मी म्हणण्याची सवय लावा. जेव्हा त्यांना कुणाला काही सांगायचं असेल किंवा कोणाचे लक्ष स्वतःकडे वेधायचे असेल तेव्हा त्यांना Excuse-Me म्हणायला शिकवा. यामुळे समोरच्या व्यक्तीवर चांगली छाप पडते.

Excuse-Me वापरायला शिकवा मुलांना एक्सक्यूज-मी म्हणण्याची सवय लावा. जेव्हा त्यांना कुणाला काही सांगायचं असेल किंवा कोणाचे लक्ष स्वतःकडे वेधायचे असेल तेव्हा त्यांना Excuse-Me म्हणायला शिकवा. यामुळे समोरच्या व्यक्तीवर चांगली छाप पडते.

मृतदेह सापडल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

चंदीगड, 12 डिसेंबर : हरयाणातील (Haryana News) नूंह येथे 8 दिवसांपूर्वी संशयास्पद परिस्थितीत बेपत्ता झालेल्या 3 वर्षीय मुलीचा मृतदेह (Dead Body) शनिवारी शेजारच्या घरात दफन केलेल्या अवस्थेत सापडला. मृतदेह सापडल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. मुलीचा मृतदेह सापडल्याची माहिती कुटुंबीयांनी आधी पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी मुलाचा मृतदेह ताब्यात घेतला असून पोस्टमार्टमसाठी पाठविण्यात आला आहे. (dead body of a 3 year old girl found in a neighboring house had been missing for eight days)

आज राजकीय शहीद हशन खान मेवाती मेडिकल कॉलेजमधून मुलीचा पोस्टमार्टम केलं जात आहे. पोस्टमार्टमनंतरच मृत्यूचं नेमकं कारण समोर येईल. सध्या पोलीस सर्व बाजूंनी तपास करीत आहेत. घटनास्थळावरुन पोलिसांनी मुलीच्या मृतदेहाशेजारील माती, आदी पुरावे जमा केले आहेत. याशिवाय घर मालकाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे.

या प्रकरणात पोलीस ठाण्याचे प्रभारी चंद्रभान सिंह यांनी सांगितलं की, सिटी एरियाचे बासदल्ला निवासी तारिफने 5 डिसेंबर रोजी आपल्या 3 वर्षीय मुलगी मौसिना बेपत्ता झाल्याची तक्रार केली होती. ज्यानंतर पोलिसांनी तक्रार दाखल करून मुलीचा तपास सुरू केला होता. दुसरीकडे मुलीचे कुटुंबीय आपल्या नातेवाईकांसह जवळील भागात मुलीचा शोध घेत होते. गेल्या 8 दिवसांपूर्वी स्थानिक पोलीस विविध भागात मुलीचा शोध घेत होते. जवळील राज्यातही मुलीचा फोटो पाठवून पोलिसांना शोध घेण्यास सांगण्यात आलं होतं. शनिवारी तारीफचा शेजारी शौकिन आपल्या घरातील मातीचा ढिगारा साफ करीत होता. त्यावेळी मातीत मुलीचा हात दिसला. यानंतर शौकिनने मुलीच्या कुटुंबीयांना याबाबत सूचना दिली.

हे ही वाचा-पुणे: पुतणीसोबत काकाचं घृणास्पद कृत्य, 4महिन्यांपासून सुरू होता धक्कादायक प्रकार

कुटुंबीयांना मुलीचा मृतदेह बाहेर काढून पोलिसांना याबाबत सूचना दिली. यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मुलीचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला. मुलीसोबत नेमकं काय झालं, याबाबत तपास केला जात आहे. पोलिसांनी चौकशीसाठी घऱमालकालाही ताब्यात घेतलं आहे.

First published:
top videos

    Tags: Crime news, Haryana, Murder