मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

पोलिसांनी लावली मृतदेहाची बोली, 40 हजारात रुग्णालयासोबत डील...Video मुळे खळबळ

पोलिसांनी लावली मृतदेहाची बोली, 40 हजारात रुग्णालयासोबत डील...Video मुळे खळबळ

4 वर्षांच्या मुलाच्या मृत्यूनंतर त्याचा 40 हजारात करार करण्यात आला.

4 वर्षांच्या मुलाच्या मृत्यूनंतर त्याचा 40 हजारात करार करण्यात आला.

4 वर्षांच्या मुलाच्या मृत्यूनंतर त्याचा 40 हजारात करार करण्यात आला.

    सपोल, 20 फेब्रुवारी : बिहारमधील पोलिसांबाबत एक धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. 4 वर्षांच्या मुलाच्या मृत्यूनंतर त्याचा 40 हजारात करार करण्यात आला. वाचताना किंवा ऐकताना ही बाब हैराण करणारी वाटत असली तरी सुपोल जिल्ह्यातील पोलीस ठाण्याचे प्रमुख मनोज कुमार महतो (SHO Manoj Kumar Mahto) आणि अप्पर ठाणाध्यक्ष विनोद कुमार सिंह (Vinod Kumar Singh) यांनी हे कृत्य केलं आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Viral Video) व्हायरल होत आहे. पोलिसांनी 40 हजारात केला मृतदेहाचा करार... डॉक्टर आणि कुटुंबीयांमध्ये सुपोल पोलिसांनी 40 हजार रुपयात सेटिंग केली आणि मृत्यूचा सौदा झाला. यावर नो कोणी तक्रार केली ना कोणी कारवाई. या प्रकरणात पोलिसांनी ऑन द स्पोट निर्णय दिला. कुटुंबीयांना हे पटलं नव्हतं. मात्र पोलिसांमुळे त्यांचं कोणीच ऐकलं नाही. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एसडीपीओने तपास करीत कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. सुपोलच्या लाइफ लाइन रुग्णालयात घडला हा प्रकार... ही घटना सुपोलच्या लाइफ लाइन रुग्णालयातील आहे. या रुग्णालयाच्या बोर्डावर डॉक्टर घनश्याम सिंह, डॉक्टर राजीव रंजन, डॉक्टर निमित कुमार, डॉक्टर दिनेश कुमार, डॉक्टर अजय कुमार कुंदन आणि डॉक्टर डीके मिश्रा सारख्या प्रसिद्ध डॉक्टरांची डिग्री ते रजिस्ट्रेशन नंबरपर्यंत लिहिलं होतं. लाइफ लाइन रुग्णालयातील ट्रॉमा सेंटरसह आयसीयू आणि एनआईसीयूपर्यंतच्या सुविधा देण्याचा दावा केला जात आहे. या लाइफ लाइन रुग्णालयात मृतदेहाची डील करण्यात आली. रुग्णालयावर निष्काळजीपणाचा आरोप.. सुपोलच्या लाइफ लाइन रुग्णालयात बुधवारी कुम्हेट गावात राहणारा विनोद यादव याच्या चार वर्षांच्या मुलाला सर्दी-खोकला झाल्यामुळे रुग्णालयात दाखल केलं होतं. रुग्णाच्या नातेवाईकांनी सांगितलं की, रुग्णालयात त्याच्यावर 10 वाजेपर्यंत उपचार सुरू होता. ज्यानंतर डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे मुलाचा मृत्यू झाला. यादरम्यान रुग्णालयाने रुग्णाच्या नातेवाईकांकडून तब्बल 60 ते 70 हजार रुपयांचं बिल जमा करवून घेतलं. आणि रात्री 12 वाजता मुलाच्या मृत्यूची बातमी सांगून रुग्णालय बंद करण्याचा निर्णय घेतला. रुग्णाच्या कुटुंबीयांनी मुलाचा मृतदेह मागितला तर तेथील रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी मारहाण केली. मृतदेह रुग्णवाहिकेत टाकून दुसऱ्या ठिकाणी पाठवण्यात आला. ज्यानंतर कुटुंबीय सकाळी काही गावकऱ्यांसोबत रुग्णालयात आले. त्यावेळी पोलिसही प्रकरण मॅनेज करण्यासाठी तेथे पोहोचली होती. हे ही वाचा-दोन गे तरुणांनी मिळून तिसऱ्या गे व्यावसायिकाची केली हत्या; आधी गळा दाबला आणि... सुपोलच्या लाइफ लाइन रुग्णालयाचे डॉक्टर आणि पोलिसांनी मिळून मृतदेहाची बोली लावली. यानंतर कुटुंबीयांसोबत असलेल्या एका व्यक्तीने फोन पेवर 20 हजार ट्रान्सफर केले. पोलिसांनी 20 हजारांची कॅश देऊन प्रकरण सोडवल्याचा दावा केला. ज्यानंतर कुटुंबीयांना मुलाचा मृतदेह मिळाला. हा सारा प्रकार व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Bihar, Shocking video viral

    पुढील बातम्या