मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

धक्कादायक! सोनं आणि चांदी नाही, तर कबरीतील मृतदेहांची चोरी; विचित्र घटनेनं खळबळ

धक्कादायक! सोनं आणि चांदी नाही, तर कबरीतील मृतदेहांची चोरी; विचित्र घटनेनं खळबळ

यात दागिने किंवा पैशांची नाही, तर चक्क मृतदेहांची चोरी करण्यात आली आहे. बिहारमधील पूर्णिया जिल्ह्यातील स्मशानभूमीतून 5 मृतदेहांची चोरी झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. (Dead Bodies Missing)

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Bihar, India
  • Published by:  Kiran Pharate

पाटणा 27 ऑगस्ट : चोरीच्या अनेक घटना तुम्ही आजवर ऐकल्या किंवा पाहिल्याही असतील. मात्र, चोरीची काही प्रकरणं इतकी विचित्र असतात की सगळ्यांनाच चक्रावून सोडतात. आता मात्र एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. यात दागिने किंवा पैशांची नाही, तर चक्क मृतदेहांची चोरी करण्यात आली आहे. बिहारमधील पूर्णिया जिल्ह्यातील स्मशानभूमीतून 5 मृतदेहांची चोरी झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.

Reels बनवण्याच्या हौसेपोटी भिवंडीतील अल्पवयीन मुलाचं भलतंच कांड; भांडाफोड होताच पोलिसांनी शिकवला धडा

ही घटना कसबा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नौलखा स्मशानभूमीतील आहे, जिथे जमिनीत पुरलेले पाच मृतदेह चोरीला गेले. यापूर्वी 2014 मध्येही याच स्मशानभूमीतून 7 मृतदेह चोरीला गेले होते. आतापर्यंत या प्रकरणाचा खुलासा झालेला नाही. नौलखा येथील स्मशानभूमीत लोक अंत्यसंस्कारासाठी पैसे नसलेल्या मृतदेहांचे दफन करतात.

स्थानिक ग्रामस्थ गुरे चारण्यासाठी स्मशानभूमीत गेले असता ही बाब उघडकीस आली. पाच कबरींची माती बाहेर काढलेली होती आणि यातील मृतदेह गायब असल्याचं त्यांनी पाहिलं. स्थानिक ग्रामस्थ आणि हिंदुस्थानी आवाम मोर्चा (मागासवर्गीय सेल) चे जिल्हा उपाध्यक्ष राम कुमार महतो यांनी सांगितलं की, या स्मशानभूमीत महादलित समाजातील लोकांचे मृतदेह पुरले जातात.

संतापजनक! ग्राहकाने पिझ्झा-बर्गर घेतलं अन् बदल्यात डिलिव्हरी बॉयला घातली गोळी!

स्मशानभूमीतून एकाचवेळी पाच मृतदेह चोरीला गेल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. घरांमध्ये होणाऱ्या चोरीनंतर आता चक्क मृतदेह चोरीला गेल्याने लोक हैराण झाले आहेत. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार गरिबीमुळे लोक पैशाअभावी मृतदेह जाळण्याऐवजी दफन करतात. मृतदेहांची तस्करी करून वैद्यकीय महाविद्यालयात पाठवले जात असल्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.

First published:

Tags: Dead body, Shocking news