मुंबई, 14 जून: अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम (Gangster Dawood Ibrahim) चा गँगस्टर (Gangster Fahim Machmach) फहीम मच्छमचने एका व्यावसायिकाला धमकवल्याची माहिती समोर आली आहे. घाटकोपरमधील व्यावसायिकाला मच्छमचनं तब्बल 50 रुपयांच्या खंडणी (Extortion Case)मागितली आहे. पोलिसांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
फहीम मच्छमच यानं व्यावसायिकाला फोन करुन धमकावलं आणि 50 लाख रुपयांची मागणी केली. हा धमकीचा फोन चार दिवसांपूर्वी आला असून घाटकोपर पोलिसांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. तसंच या प्रकरणाचा तपास खंडणीविरोधी पथकाकडे देण्यात आला आहे.
आता खंडणी प्रकरणी मुंबई पोलिसांनी गुंड दाऊद इब्राहिम याच्या साथीदारावर गुन्हा दाखल केला आहे. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चार दिवसांपूर्वी 10 जून रोजी गुंड फहीम मच्छमच यांनी घाटकोपर येथील व्यावसायिकाला 50 लाखांची मागणी केली होती. पैसे न मिळाल्यास परिणाम वाईट होतील, अशी धमकीही देण्यात आली होती.
4 days ago Gangster Fahim Machmach(aide of Dawood Ibrahim), called a Ghatkopar-based businessman for Rs 50 lakhs extortion & threatened him with consequences if demand not fulfilled. Ghatkopar Police lodged case & transferred it to anti-extortion unit: Mumbai Police#Maharashtra
— ANI (@ANI) June 14, 2021
दरम्यान नोव्हेंबरमध्ये दक्षिण मुंबईतील एका व्यावसायिकाकडून खंडणी मागण्याच्या आरोपाखाली फहीम मच्छमच याच्या तीन साथीदारांना पोलिसांनी अटक केली होती.
हेही वाचा- परमबीर सिंह यांची तूर्तास अटक टळली, राज्य सरकारची न्यायालयात हमी
फहीम मच्छमच हा दाऊद इब्राहिम टोळीतील छोटा शकीलचा साथीदार असल्याचं समजतंय. तसंच खंडणीसाठी आलेला फोन कॉल हा एक व्हीओआयपी इंटरनेट कॉल होता. फहीम मच्छमचच्या आवाजाच्या नमुनाशी तो जुळत नसल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. त्यामुळे स्थानिक टोळी दाऊद इब्राहिमचे नाव घेऊन खंडणीची मागणी करत असल्याचा संशयही पोलिसांना आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Dawood ibrahim