संतापजनक...शिक्षकानेच केला अल्पवयीन विद्यार्थ्यीनीवर सामुहिक बलात्कार

संतापजनक...शिक्षकानेच केला अल्पवयीन विद्यार्थ्यीनीवर सामुहिक बलात्कार

आरोपी शिक्षकाने पीडीत मुलीला तुला गणिताच्या नोट्स देतो, माझ्यासोबत चल असं सांगितलं होतं. त्यानंतर त्याने तिला त्याच्या बाईकवर बसवलं आणि अपहर केलं.

  • Share this:

दौसा 13 ऑक्टोंबर : शिक्षक आणि विद्यार्थी या नात्याला काळामी फासणारी एक घटना राजस्थानात घडलीय. एका शिक्षकानेच आपल्या मित्रांच्या मदतीने एका अल्पवयीन विद्यार्थीनीवर सामुहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडलीय. या शिक्षकाने इतर दोन मित्रांच्या मदतीने आपल्याच विद्यार्थीनीचं अपहर केलं आणि एका निर्जन स्थळी नेवून तिच्यावर बलात्कार केला. पीडीत मुलगी त्या शिक्षकाकडे ट्युशनला येत होती अशी माहिती पोलिसांनी दिलीय. या घटनेनंतर दौसा शहरात संतापाची लाट उसळली असून आरोपी शिक्षक आणि त्याच्या मित्राविरुद्ध कठोर कारवाईची मागणी पालक संघटनांनी केलीय.

आईची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

दौसा जिल्ह्यातल्या एका गावात ही मुलगी खासगी शाळेत 11वीत शिकत होती. ती एका शिक्षकाकडे ट्युशनला जात होती. घटनेच्या दिवशी ती जेव्हा ट्युशन झाल्यानंतर त्या शिक्षकाने इतर तीन मित्रांच्या मदतीचं पीडीत मुलीचं अपहरण केलं आणि एका पडक्या घरात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. नंतर त्या मुलीने आपल्या पालकांना घटनेची माहिती दिली आणि त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये जावून गुन्हा नोंदवला.

कॉलेजच्या पहिल्याच दिवशी 28 विद्यार्थ्यांना विवस्त्र करून घेतली 'ओळखपरेड'

आरोपी शिक्षकाने पीडीत मुलीला तुला गणिताच्या नोट्स देतो, माझ्यासोबत चल असं सांगितलं होतं. त्यानंतर त्याने तिला त्याच्या बाईकवर बसवलं आणि तीचं अपहर केलं. नंतर त्याने त्याच्या मित्रांनाही बोलवलं आणि अत्याचार केला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध घ्यायला सुरूवात केलीय. घटनेनंतर शिक्षकांसहीत इतर दोनही आरोपी फरार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 13, 2019 11:46 PM IST

ताज्या बातम्या